राजकारण
नितीन सरदेसाई यांच्याकडून रत्नागिरीत चक्रीवादळातील नुकसानीची पाहणी

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्या भागाची आणि वादळानंतर झालेल्या नुकसानीची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, माजी आ. नितीन सरदेसाई यांनी पाहणी केली.
रत्नागिरी जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीने आंबा बागांची प्रचंड हानी झाली आहे. तौक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्या आंबा बागायतदारांनी नंतर सरदेसाई यांची भेट घेतली. या भेटीत सरदेसाई यांना झालेल्या नुकसानाबद्दल माहिती दिली. तसेच मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या माध्यमातून नुकसान भरपाईचा प्रश्न शासन दरबारी मांडण्याची विनंती केली. त्यावेळी सरदेसाई यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंबा बागायतदारांसह मच्छिमारांसह नुकसानग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी शिरीष सावंत, सरचिटणीस मनोज चव्हाण, व सरचिटणीस तसेच खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर आदी उपस्थित होते.