अर्थ-उद्योग

निटकोतर्फे ‘मेड इन इटली’ या 8X4 फुट आकारातील टाइल स्लॅबचे अनावरण

मुंबई, 22 मार्च 2021 : निटको लिमिटेड या भारतातील ट्रेंडसेटर ब्रँडतर्फे त्यांची ‘मेड इन इटली’ विस्तृत श्रेणी सादर करण्यात आली. ही श्रेणी पर्यावरणस्नेही असून जगभरात कोव्हिड 19 सॅनिटायझेशन प्रतिरोधक म्हणून मान्यताप्राप्त आहे. या टाइल्स अत्यंत टिकाऊ आहेत आणि या टाइल्सचे वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन अत्यंत आकर्षक आहे. या कलेक्शनमध्ये स्मॉल, मीडियमपासून एक्स्ट्रा लार्जपर्यंत (2×1 फुट, 2×2 फुट, 2×4 फुट ते 8×4 फुट) वेगवेगळे आकार उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे या श्रेणीमध्ये संगमरवर, दगड, सिमेंट आणि न्यूएव्हो इटालियन लुक हा टायपोलॉजीतील आधुनिक लुकही उपलब्ध आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोठ्या फॉरमॅटमधील फाइल्स आधुनिक तंत्रज्ञानासह उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यांची जाडी 6 मिमी (8×4 फुट) आहे, त्यांची मजबूती आणि टिकाऊपणा हा या क्षेत्रातील इतर कोणत्याही टाइलपेक्षा जास्त आहे. फक्त नैसर्गिक मातीने तयार केलेल्या आणि शॉपिंग मॉल्स, विमानतळे इत्यादी भरपूर वापर असलेल्या ठिकाणी वापरायच्या या फुल बॉडी, अनग्लेझ्ड (ग्लेझ नसलेल्या) हे फीचर असलेल्या भारतातील एकमेव टाइल्स आहेत.

‘मेड इन इटली’ कलेक्शनमधील 3 नवीन एक्सएल डिझाइन्स अझुल (निळा) आणि काळा व पांढरा ग्रॅफाइट या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहेत. या कलेक्शनमुळे ग्राहक निवासी अथवा सार्वजनिक प्रकल्पांमध्ये बोल्ड रंगछटांचा प्रयोग करून पाहू शकतात.

इटालिअन प्रिसिजन टेक्नोलॉजीमुळे (इटालियन अचूकता तंत्रज्ञान) या टाइल तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट आहेत आणि आउटडोअर्स, कमर्शिअल एरिया आणि निवासी भागांच्या भिंतीवर तसेच जमिनीवर लावण्यासाठी योग्य निवड ठरतात.

मुंबईमध्ये मुख्य कार्यालय असलेल्या या कंपनीने या आधी ‘मेड इन इटली’ टाइल्सचा पहिला संच –  इऑन, अर्थ आणि नॉर्डिक लाँच केला होता.

निटकोचे व्यवस्थापकीय संचालक विवेक तलवार म्हणाले, “मेड इन इटली टाइल्सचे आमचे नवीन कलेक्शन सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या टाइल्स विविध आकारांमध्ये उपलब्ध आहेत. 8×4 फुट हा सर्वात मोठा आकार आहे. या टाइल्स कोव्हिड सॅनिटायझेशन प्रतिरोधक आहेतच, त्याचप्रमाणे कोणत्याही जागेच्या सौंदर्यात भर घालतात. अतुलनीय भारतीय उत्कृष्टतेचे अनुभव देणारे हे कलेक्शन आमच्या ग्राहकांना आवडेल, याची आम्हाला खात्री आहे.”

www.nitco.in या वेबसाइटवर ‘मेड इन इटली’ टाइल्स कलेक्शन पाहता येईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button