इतर
अंबानी यांच्या घराबाहेर एनआयए,फॉरेन्सिक टीमकडून सचिन वाझेंचे रिक्रिएशन
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणावर एनआयएकडून कसून तपास सुरु आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी रात्री जवळपास दहा वाजेच्या सुमारास एनआयए आणि फॉरेन्सिक टीम थेट घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना कुर्ता घालून चालण्यात आलं. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये एक संशयित व्यक्ती पीपीई किटमध्ये चालताना दिसला होता. एनआयएकडून त्याच सीनचं शुक्रवारी रात्री रिक्रिएशन करण्यात आलं.