राजकारण

सचिन वाझे प्रकरणात नवा ट्विस्ट; मर्सिडीज कारसोबत भाजप नेत्याचे कनेक्शन!

मुंबई : मुंबईत स्फोटकांनी सापडलेली गाडी आणि मनसुख हिरेन हत्या (mansukh hiren death Case) प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्याकडून एनआयएच्या (NIA) टीमने मर्सिडिज गाडी जप्त केली आहे. पण या गाडीसोबत भाजप (BJP Leader) नेत्याचे संबंध असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin sawant) यांनी केला आहे. सचिन सावंत यांनी हा फोटोच ट्वीट केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

मनसुख हिरेन यांचा ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशी हिरेन यांनी एका मर्सिडीज गाडीतून प्रवास केला. त्याच मर्सिडीज कारसोबत ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी देवेन हेमंत शेळके (Deven Hemant Shelke) यांचे फोटो आहे. देवेन शेळके यांची 17 ऑक्टोबर 2020 रोजी भारतीय जनता युवा मोर्चा ठाणे ग्रामीणच्या सचिवपदी निवड करण्यात आली होती. याबद्दलचे नियुक्ती पत्रच सचिन सावंत यांनी ट्वीट केले आहे.

एनआयएच्या टीमला सचिन वाझे वापरत असलेली एक मर्सिडिज कार सापडली आहे. या कारमध्ये पाच लाखांची रोकड आणि पैसे मोजणारी मशीन सापडली आहे. पण, आता या कारमुळे राजकीय वातावरण तापले आहे. मनसुख हिरेन यांची हत्या झाली त्या दिवशी याच गाडीतून प्रवास केला होता. आता याबद्दल भाजप नेत्यांनी खुलासा करावा, अशी मागणीही सचिन सावंत यांनी केली. दरम्यान, 25 फेब्रुवारी रोजी कार मायकल रोडवर जिलेटीन स्फोटकांनी कार सापडली होती. त्यानंतर घटनास्थळावर आणखी एक इनोव्हा कार आढळून आली होती. ही पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडी सचिन वाझेच चालवत होते, अशी माहीती NIA च्या सूत्रांनी दिली आहे. तसंच, हिरवी स्कॉर्पिओ आणि पांढरी गाडी चालवणारे दुसरे तिसरे कोणी नसून CIU चे पोलीस होते.

स्कॉर्पिओ गाडी उभी करून पांढऱ्या गाडीतून सचिन वाझे आणि आणखी दोन CIU चे अधिकारी बसून मुलूंड टोल नाक्यावरुन ठाण्याला गेले होते. हिरवी आणि पांढऱ्या रंगाची इनोव्हा आणि स्कॉर्पिओ गाडी ठाणे येथेच पार्क केली होती, अशी माहितीही समोर आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button