Top Newsराजकारण

नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांनी मुंबई सत्र न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश दीपक भागवत यांनी मंगळवारी फेटाळून लावला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्या आणि पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश वाधवान यांचे संबंध असल्याचा दावा केला होता. नील सोमय्यांंनी पीएमसी बँकेचे पैसे आपल्या प्रकल्पात वापरले असून ‘बाप बेटे दोनो जेल मे जाएंगे’ असे म्हटले होते. यानंतर नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती.

अनेक दिवसांपासून संजय राऊत विरुद्ध किरीट सोमय्या असा संघर्ष सुरू आहे. ‘निकॉन इन्फ्रा’ च्या माध्यमातून अनेक ठिकाणी नील सोमय्या यांनी जमिनी बाजारभावापेक्षा कमी दरात मिळवल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी आरोप सिद्ध करून दाखवावेत, आम्ही कुठल्याही न्यायालयात जाणार नाही, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. असे असूनही नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात न्यायाधीश दीपक भागवत यांच्यासमोर सुनावणी पूर्ण झाली. त्यांनी नील सोमय्या यांचा जामीन अर्ज फेटाळत त्यांना पहिला दणका दिला आहे. त्यामुळे आता नील सोमय्यांना अटक होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर केलेल्या आर्थिक घोटाळ्याच्या आरोपावर त्यास प्रत्युत्तर म्हणून ठाकरे सरकारने खुशाल चौकशी करावी आम्ही न्यायालयात जाणार नाही, असे आव्हान देणाऱ्या माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटक पूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. मात्र, नील यांना चांगलाच दणका देत त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

एकीकडे किरीट सोमय्या संजय राऊतांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचा दावा करत असताना दुसरीकडे मात्र नील सोमय्या अटक टाळण्यासाठी न्यायालयात गेले होते. २३ फेब्रुवारीला त्यांनी ही याचिका दाखल केली होती. पुत्र नील सोमय्या यांच्या मालकीच्या निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शनमध्ये पीएमसी बँक घोटाळय़ातील आरोपी राकेश वाधवान हे भागीदार आहेत. या प्रकल्पासाठी सोमय्यांनी ४०० कोटींची जमीन साडेचार कोटींमध्ये विकत घेतल्याचा असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. तसेच बाप, बेटे जेलमध्ये जाणार असून कोठडीचे सॅनिटायजेशन सुरु असल्याचेही राऊत यांनी सांगितले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button