राजकारण

आमदार निलेश लंकेंकडून मनसे पदाधिकाऱ्याला १ कोटीची अब्रुनुकसानीची नोटीस

अहमदनगर : पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आपली बनावट ऑडिओ क्लिप तयार करुन सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी पारनेर मनसेच्या पदाधिकाऱ्याला १ कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस दिलीय. अविनाश पाटील असं या मनसे पदाधिकाऱ्याचं नाव आहे. ते पारनेर मनसेचे तालुका उपाध्यक्ष आहेत. आमदार लंके यांनी वकिलामार्फत पाठवलेल्या या नोटीसमध्ये अविनाश पाटील यांच्याकडे बदनामीपोटी १ कोटी रुपये आणि नोटीस खर्च ५ हजार असे एकूण १ कोटी ५ हजार रुपये देऊन माफी मागण्याची मागणी केली.

आमदार निलेश लंके यांनी मनसे पदाधिकारी अविनाश पाटील यांना दिलेल्या नोटीसमध्ये १ कोटी ५ हजार रुपये देऊन लेखी माफी मागण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी दिलाय. या १५ दिवसात त्यांनी तसं न केल्यास त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करु, असा इशारा दिलाय.

निलेश लंके यांचे वकील राहुल झावरे म्हणाले, पारनेरचे लोकप्रतिनिधी निलेश लंके मनसेचे पदाधिकारी अविनाश पवार यांनी बनावट ऑडिओ तयार करुन फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामवर बदनामी केलीय. त्यामुळे त्यांना कायदेशीर १ कोटीची अब्रुनुकसानीची नोटीस दिली आहे. आमदार निलेश लंके यांचं काम जगभर पोहचलं आहे. शरदचंद्र पवार आरोग्य मंदिराच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याचं चांगलं उदाहरण त्यांनी उभं केलंय. अशा माणसाची बदनामी केली जात असेल तर त्याला कायदेशीर नोटीस देणं आवश्यक आहे.

अब्रुनुकसानीची १ कोटी रुपयांची नोटीस मिळाल्यानंतर मनसे पदाधिकारी अविनाश पाटील यांनी एक व्हिडीओ शेअर करत थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच मदतीसाठी आवाहन केलंय. तसेच आमदार निलेश लंके यांनीच फोनकरुन मला आणि पक्षाला शिवीगाळ केल्याचा आरोप केलाय.

माझा व्हिडीओ राज ठाकरेंना दाखवा

आपल्यावरील आरोपांवर मनसेचे पारनेरचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार म्हणाले, बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, संदीप देशपांडे यांच्यासह सर्व मनसे सैनिकांना माझी विनंती आहे की माझा हा व्हिडीओ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवा. साहेबांना सांगा की तुमचा मनसे सैनिक पूर्णपणे खचला आहे. आता सहन होत नाही. ११ मे रोजी माझ्यासोबत एक प्रसंग घडला. मी आरोग्य यंत्रणेच्या संपर्कात असताना पारनेरचे लोकप्रतिनिधी निलेश लंके यांनी डॉ. गंधे यांच्या फोनवरुन फोन केला. तेव्हा डॉ. गंधे यांनी मला आमदार लंकेंसोबत बोलण्यास सांगितले. तेव्हा लंके यांनी मला आणि मनसे पक%

Related Articles

Back to top button