पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आरोप करताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची जीभ चांगलीच घसरली. ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा हा पक्ष आहे, असे त्यांनी म्हटले आले आहे. लावणी कलावंत सुरेखा पुणेकर आणि शांताबाई फेम गायक संजय लोंढे यांच्यासह काही कलाकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय. १६ ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. या प्रवेशाबाबत बोलताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं.
सुप्रसिद्ध लावणी कलावंत सुरेखा पुणेकर आणि शांताबाई फेम गायक संजय लोंढे यांच्यासह काही कलाकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय. १६ ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. या प्रवेशाबाबत बोलताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं.
राज्य सरकारने या समाजातील लोकांना दिलेली अश्वासने अद्याप पूर्ण केली नाहीत, जे दुर्दैवी आहे. pic.twitter.com/FRZhRRQQuZ
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) September 13, 2021
पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे बोलताना दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आक्षेपार्ह टीका केली आहे. त्यावरुन आता राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. शिरूर येथे राजे उमाजी नाईक यांच्या २३० व्या जयंती निमित्त जय मल्हार क्रांती संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला दरेकर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे, अशी टीका दरेकर यांनी केली. त्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. आमदार अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दरेकरांवर जोरदार हल्ला चढवला आहे. दरेकर यांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येतेय.
प्रवीण दरेकर शिरुर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेस हा बँकवाल्यांचा, कारखानदारांचा पक्ष आहे. तर भाजप हा गोरगरीबांचा पक्ष आहे. ७ ते ८ वर्ष झाली घोडगंगा कारखान्याचा पगार नाही. महाविकास आघाडी सरकारला सांगतो तुमची सत्ता उद्ध्वस्त करण्याचं काम बेरड आणि रामोशी समाज करेल. या समाजाच्या अनेक मागण्या आहेत. दुर्दैवानं आपलं सरकार आलं नाही. पण त्या प्रश्नांना न्याय देऊ, असं आश्वासन दरेकर यांनी दिलं आहे.
पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीत बलात्कार, महिलांवर अत्याचार होत आहेत. याला हे नालायक सरकार जबाबदार आहे. त्यांना फक्त आपली सत्ता टिकवायची आहे. काही त्यांना काही देणंघेणं नाही, असा आरोपही दरेकरांनी केलाय. बैलगाडा शर्यतीत जे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे १५ दिवसांत मागे घेऊ असा शब्द दिला गेला. मात्र अद्याप ते गुन्हे मागे घेतले गेले नाहीत. महत्वाची बाब म्हणजे गृहमंत्री पुणे जिल्ह्याचेच आहेत.
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवरुनही प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. या निर्णयाविरुद्ध सरकारला शंभर टक्के अध्यादेश काढता आला असता. मात्र या सरकारचा निष्काळजीपणा, दिरंगाई आणि ढिसाळपणा कारणीभूत आहे. कोर्टानं चार चार वेळा कळवले मागासवर्गीय आयोग स्थापन करुन कोर्टाला कळवावं. ते सहज शक्य होतं. मात्र, जाणीवपूर्वक सरकारने दुर्लक्ष केलं. आता सर्व पक्षांनी सहमती दर्शवल्यानंतर गतीने निर्णय घेतले असते तर कदाचित कोर्टानं भूमिकाही बदलली असती, असं दरेकर म्हणाले.