राजकारण

नारायण राणे रायगड पाेलिसांसमाेर हजर

अलिबाग : न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज रायगडपोलिसांकडे हजेरी लावली. पाेलिसांनी त्यांचा जबाब नाेंदवून घेतला मात्र त्यांचे काेणतेही व्हाॅईस सॅम्पल घेतले नाही.

जन आशिर्वाद यात्रेदरम्यान महाड येथे राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले हाेते. राणे यांना महाड पाेलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले हाेते. त्यांनतर न्यायालयाने राणे यांना काही अटी, शर्तीवर जामिन मंजूर केला हाेता. ३० ऑगस्ट आणि १३ सप्टेंबर अशा दाेन दिवस राणे यांनी रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात हजेरी लावावी असे आदेश न्यायालयाने दिले हाेते. ३० ऑगस्ट राेजी प्रकृती ठिक नसल्याचा अर्ज राणे यांच्या वकीलानी रायगड पाेलिसांना देत राणे गैहजर राहीले हाेते. १३ सप्टेंबरला राणे हजेरी लावणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले हाेते.

केंद्रीय मंत्री राणे हे जुहू येथील निवास्थानातून साेमवारी दुपारी १२ वाजता अलिबागकडे रवाना झाले. दुपारी ठिक आडीच वाजता जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या कार्यालयात हजर झाले. अवघ्या १५ मिनीटांतच पाेलिसांनी त्यांची हजेरी घेत जबाब नाेंदवला. त्यानंतर राणे बाहेर पडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button