राजकारण

नागपुरात फडणवीसांना हादरा देण्याची नाना पटोलेंची व्यूहरचना

नागपूर : काँग्रेसकडून नागपूर महापालिका निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. महापालिकेतील भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोर लावल्याचं पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर पटोले यांच्या उपस्थितीत आज काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आलीय. या बैठकीत बोलताना पटोले यांनी मोठं विधान केलंय. पक्षाने आदेश दिल्यास नागपूर दक्षिण-पश्चिममधून लढेन असं वक्तव्य पटोले यांनी केलं आहे. महत्वाची बाब म्हणजे हा मतदारसंघ विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नाना पटोले देवेंद्र फडणवीसांविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पहिल्या दिवशी नागपुरातील तीन विधानसभा मतदारसंघात आढावा बैठकीचं नियोजन करण्यात आलं. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण – पश्चिम मतदारसंघातून नाना पटोले यांनी आढावा बैठकी घ्यायला सुरुवात केली आहे. म्हणजेच राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांच्या मतदारसंघातूनच भाजपला हादरे देण्याची व्यूहरचना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आखल्याचं पाहायला मिळत आहे.

काँग्रेसने नागपूर महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरु केलीय. याचाच एक भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आलीय. यावेळी प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना आणि अडचणी जाणून घेतल्या आणि भाजपला टक्कर देण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश नाना पटोले यांनी दिले.

यंदा काहीही करुन नागपूर महापालिकेवरचा भाजपचा झेंडा खाली उतरवायचा, असा निश्चय काँग्रेसने केला आहे. आतापासूनच काँग्रेस नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी त्यादृष्टीने कामाला लागले आहेत. त्याच अनुषंगाने आजची महत्त्वाची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलावली. पण या बैठकीला काँग्रेसचे पहिल्या फळीतील नेते उर्जामंत्री नितीन राऊतांनीच गैरहजेरी लावल्यामुळे दबक्या आवाजात चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळालं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button