राजकारण

अमरिंदर सिंग यांच्या बंगल्यात राहणाऱ्या पाकिस्तानी महिलेचे गूढ !

चंदीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या सरकारी निवासस्थानी तब्बल साडेचार वर्षे त्यांची एक पाकिस्तानी मैत्रीण राहत होती. या महिलेचे नाव अरुसा आलम असून, ती संरक्षणविषयक पत्रकार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही महिला व कॅप्टन यांचे खास संबंध होते आणि पंजाबच्या राजकीय तसेच सांस्कृतिक वर्तुळातील सर्वांना हे माहीत होते. ती तिथे का राहत होती, याचे तसेच आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी असलेल्या कथित संबंधांची चौकशी करण्याचे आदेश पंजाब सरकारने दिले आहेत.

उपमुख्यमंत्री म्हणाले की, पंजाबला आयएसआयपासून धोका आहे, असे अमरिंदर सिंग का सांगत आहेत, त्यांना ही माहिती कोण देत आहे, हेही आपण तपासत आहोत. चौकशीचा ससेमिरा आपल्या पाठी लागू नये, म्हणूनच कॅप्टन आता भाजपला मदत करीत आहेत, असाही आरोप त्यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button