अशी ही बनवाबनवी! सर्वाधिक लसीकरणाच्या विक्रमामागे मोदी सरकारचे गूढ रहस्य !
नवी दिल्ली : देशात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी एकाच दिवसात तब्बल ८८ लाख लोकांचे लसीकरण झाल्याचा विक्रम नोंदवण्यात आला होता. मात्र या विक्रमावर ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिंदबरम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. रविवारी लसीचा साठा केला, सोमवारी लसीकरण केले अन् त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी ‘जैसे थे’ स्थिती झाली असा दावा पी. चिंदबरम यांनी केला आहे. चिंदबरम यांनी केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
‘मोदी है, तो चमत्कार है’
पी. चिंदबरम यांनी ट्विट करून म्हटलं की, रविवारी लसींचा साठा करण्यात आला. सोमवारी लोकांचे लसीकरण झाले आणि मंगळवारी पुन्हा पहिल्यासारखीच परिस्थिती उद्भवली. एका दिवसात लसीकरण करण्याचा विक्रम करण्यामागे हेच गूढ रहस्य आहे. मला विश्वास आहे केंद्राच्या या कर्तुत्वाला गिनीज बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये जागा मिळाली आहे. पुढच्या ट्विटमध्ये ते सांगतात की, कोणाला ठाऊक, पण मेडिसिनचा नोबेल पुरस्कार मोदी सरकारलाही दिला जाऊ शकतो. ‘मोदी है तो मुमकीन है’ या वाक्याऐवजी आता ‘मोदी है, तो चमत्कार है’ असं वाचायला हवं असा टोला चिंदबरम यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.
कौन जाने, हो सकता है मेडिसिन का नोबेल पुरस्कार मोदी सरकार को दिया जाए।
'मोदी है, मुमकिन है' को अब पढ़ना चाहिए 'मोदी है, चमत्कार है'
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) June 22, 2021
देशात या वर्षाच्या अखेरपर्यंत सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचं लक्ष्य केंद्र सरकारने आखलं आहे. सोमवारी ८८ लाख लोकांचे लसीकरण केल्यानंतर फुगा फुटला. मंगळवारी रात्री १० पर्यंत आकड्यांनुसार देशात ५३ लाख ८६ हजार लोकांचे लसीकरण झाले. त्याच्या एक दिवस आधी सोमवारी जेव्हा लसीकरणाची सुरूवात झाली तेव्हा ८८ लाख लोकांचे लसीकरण झाले होते. मंगळवारी सर्वाधिक ७ लाख ९६ हजार लोकांचे लसीकरण उत्तर प्रदेशात करण्यात आले. परंतु मध्य प्रदेशातील आकडा विचार करण्यासारखा होता. जिथे सोमवारी रेकॉर्डनुसार १६ लाख ९५ हजार लसीकरण झालं तिथं मंगळवारी फक्त ४ हजार ८२५ जणांना लस देण्यात आली.
I am appalled that eminent doctors attribute Monday’s record to “planning”. The plan was to “doctor” the numbers on Monday
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) June 23, 2021
लसीकरणाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यासाठी साठा करण्यात आला. मध्य प्रदेशासह काही राज्यात सोमवारी रेकॉर्डस्तरीय आकडे गाठण्यासाठी अनेक दिवसांपासून लसींचा साठा जमा केला होता असा आरोप आहे. सर्वाधिक लसीकरण करणाऱ्या १० राज्यांपैकी ७ राज्यात भाजपाचं सरकार आहे असंही काँग्रेसनं म्हटलं आहे.