मनोरंजन

राज कुंद्रा प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोप्राला मुंबई पोलिसांचे समन्स

मुंबई : राज कुंद्रा अश्लील फिल्म प्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिला गुन्हे शाखेकडून समन्स बजावण्यात आला आहे. राज कुंद्रा याला अटक झाल्यानंतर गुन्हे शाखेकडून वेगाने तपास सुरू आहे. या प्रकरणात रविवारी अभिनेत्री गेहाना वसिष्ठ आणि इतर दोन जणांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर आज शर्लिन चोप्राची हिला चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आला आहे. प्रॉपर्टी सेलमध्ये चौकशीसाठी हे समन्स बजावण्यात आले आहेत. राज कुंद्रा अश्लील चित्रपट प्रकरणात शर्लिन चोप्राची चौकशी करण्यात येणार आहे. या आधीही सादर प्रकरणात शर्लिन चोप्रा हिचे नाव समोर आले होते.

https://twitter.com/SherlynChopra/status/1418118199996870658

शार्लिन चोप्राने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत राज कुंद्रा आणि अश्लील चित्रपटांवर आपले मत उघड केले होते. ज्यामध्ये तिने महाराष्ट्र सायबर सेलकडे या विषयावर जबाब देणारी मी पहिली अभिनेत्री असल्याचे सांगितले होते.या व्हिडिओमध्ये शर्लिन चोप्राने पुढे सांगते की ‘जेव्हा मला कोर्टाकडून समन्स बजावण्यात आला तेव्हा मी त्यांच्यासारखी गायब झाले नाही. मी शहर किंवा देश सोडण्याचा प्रयत्न केला नाही. मार्च २०२१ मध्ये मी महाराष्ट्र सायबर सेलसमोर माझा निःपक्षपाती जबाब नोंदवला. मी पत्रकार आणि मीडिया रिपोर्टरला विनंती करते की, महाराष्ट्र सायबर सेलशी संपर्क साधा आणि आपले प्रश्न त्यांच्यासमोर ठेवा आणि शक्य असल्यास माझ्या जबाबातील काही माहिती त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button