मनोरंजन

टिंडरच्या स्वाइप राइड सीरीजकडून सर्व प्रकारच्या डेटिंगचा सन्मान

मुंबई : टिंडर हा नवीन लोकांमधील संपर्क स्थापित करणाऱ्या जगातील सर्वाधिक लोकप्रिय अ‍ॅप भारतात महिलांना आपल्या डेटिंग आयुष्यात नक्की काय हवे आहे त्याबद्दल सर्वांगीण आणि अर्थपूर्ण संवाद साधण्यासाठी सज्ज आहे. सोशल मीडिया कंटेंट निर्माती कुशा कपिला ड्रायव्हरच्या सीटवर असून ती टिंडर सदस्याला आपल्या डेटला भेटायला नेणार आहे आणि तिच्याशी डेटिंगचे नाते, नात्याची सखोलता, मनातील भीती आणि जुनाट परंपरा व आधुनिक विचारसरणीमधील गोंधळ या सर्वांबाबत ती चर्चा करणार आहे. या आठवड्यात या दोन स्त्रियांसोबत येणार आहे बॉलीवूडची सॅसी क्वीन सारा अली खान!

या तिघी डेटिंगबद्दल सर्व गोष्टीची चर्चा करतील. टिंडरवरील धमाल बायोंपासून ते डेटिंगच्या नियमांपर्यंत आणि आपण खरे आहोत हे दर्शवण्याचे महत्त्व. त्याचबरोबर इतरही अनेक गोष्टी त्यांच्या गप्पांमधून उलगडतील. स्वाइप राइड सीरिजचा पहिला एपिसोड टिंडरच्या यूट्यूब चॅनलवर शुक्रवार २२ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होईल.

“तुम्ही कोण आहात हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे कारण तुम्ही जसे आहात ते सांगणे खूप सोपे आहे. मागील काही वर्षांत मला हेही जाणवले आहे की, प्रत्येकाला खूश करणे शक्य नाही- वैयक्तिकीकरण आणि तुम्ही स्वतःसारखे वागणे खूप महत्त्वाचे आहे,” असे मत सारा अली खानने व्यक्त केले. टिंडरने भारतीय महिला कशा प्रकारे डेटिंग करतात हे समजून घेतले आहे आणि मला स्वाइप राइड सीरिजचा भाग होताना खूप आनंद झाला. ही तुम्हाला जज न करणारी सुरक्षित जागा आहे, जिथे वैश्विक स्वरूपात अनुभव घेतलेल्या आपल्या प्रेमजीवनाबाबतची सत्ये क्वचित खुलेपणाने मांडली जातात. ते खूप मनापासून आलेले आहे आणि मला या संवादाचा तसेच डेटिंगच्या नियमांचा नव्याने अर्थ सांगणाऱ्या पिढीचा भाग होताना खूप आनंद वाटतो आहे.

“भारतीय समाजाने कायमच महिलेने सर्व बाबतीत कशा प्रकारे वागले पाहिजे याच्या व्याख्या केल्या आहेत. स्वाइप राइड सीरिजसोबत टिंडरचे महिला सदस्य अशा पुरातन समाजाच्या संकल्पनांची नव्याने व्याख्या करताना आणि आपल्या गोष्टी नव्याने लिहिताना पाहणे हे मला माझ्या तरूण वयाशी संवाद साधल्यासारखे वाटत होते. चालकाच्या सीटवर असणे, आजच्या प्रत्येक महिलेला प्रत्यक्षात आणि एकूणच संकल्पनेत आवश्यक आहे आणि मला या अर्थपूर्ण संवादांचा भाग होताना खूप अभिमान वाटतो, असे कुशा कपिला म्हणाल्या.

“तरूणांना चांगली नाती, स्वीकारार्ह जोडीदार आणि प्रेमाच्या नियमांबाबत जुळवून घेण्यासाटी सातत्याने ताणतणाव आणि इतरांच्या मतांचा सामना करावा लागतो. सर्व महिला या अत्यंत वेगळ्या आणि खास असतात. स्वाइप राइड सिरीजसोबत आम्हाला तरूण भारतीय महिलांचे विविधांगी दृष्टीकोन आणि त्यांच्या डेटिंगचा प्रवास साजरा करून त्यांना प्रोत्साहन द्यायचे आहे,” असे मत टिंडर आणि मॅच ग्रुप इंडियाच्या महा-व्यवस्थापक तरू कपूर यांनी व्यक्त केले. ”टिंडरमध्ये आम्ही कायमच स्वायत्तता, निवड आणि आपल्याला व्यक्त करण्याच्या कलात्मक पद्धतींद्वारे आमचा अ‍ॅप सर्वसमावेशक बनवण्यावर भर दिला आहे, जेणेकरून आमच्या सदस्यांसाठी एक चांगला अनुभव देता येईल.”

चित्रपट दिग्दर्शक डेबी राव यांनी लोकप्रिय कॉमिक्स आणि लेखक श्रीजा चतुर्वेदी व सुप्रिया जोशी यांच्यासोबत निर्मिती केलेली स्वाइप राइड सिरीज हे आपले करियर असो वा त्यांच्या डेटिंग आयुष्यात स्वतःचे निर्णय घेऊ इच्छिणाऱ्या महिलांनी एकत्र येऊन तयार केलेले उत्पादन आहे. डेटिंगचा अनुभव मजेशीर आणि मोबाइलद्वारे सहजसाध्य बनवण्याबरोबरच आणि डबल ऑप्ट इन व स्वाइप वैशिष्ट्यात नवप्रवर्तन आणून टिंडर निनावीपणा कमी करणाऱ्या, जबाबदारी वाढवणाऱ्या तसेच सदस्यांना सुरक्षित ठेवणाऱ्या तंत्रज्ञानात गुंतवणूक करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button