राजकारण

भाजपचे खासदार रामस्वरूप शर्मा यांचा दिल्लीत संशयास्पद मृत्यू

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीमध्ये भाजपचे मंडी, हिमाचल प्रदेशचे खासदार रामस्वरुप शर्मा (Ram Swaroop Sharma) यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. गोमती या खासदार निवासस्थानी पहाटे त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

शर्मा सध्या दिल्लीतील गोमती अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास होते. लोकसभा निवडणुकीमध्ये ( Loksabha Election 2019) त्यांनी मंडी लोकसभा मतदारसंघातून ऐतिहासिक विजय मिळवला होता. हिमाचल प्रदेशातील एक हॉट सीट असणाऱ्या जागेवर त्यांनी विजय मिळवला होता. त्यांनी काँग्रेस उमेदवार आश्रय शर्मा यांनी जवळपास 4 लाख मतांनी हरवले होते. आतापर्यंत मंडीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय मानला जातो. भाजप खासदाराच्या मृत्यूनंतर आता संसदीय समितीची बैठक रद्द करण्यात आली आहे.

दरम्यान घटनास्थळावरून अद्याप कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही आहे. पोलिसांच्या माहितीनुसार याठिकाणी असणाऱ्या स्टाफने सकाळी 7 च्या सुमारास पोलिसांना फोनवरुन माहिती दिली. सुरुवातीला त्यांची खोली आतून बंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस गेट तोडून आतमध्ये शिरले. गळफास लावलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह गोमती अपार्टमेंटमध्ये सापडला. त्यांना खाली उतरवून रुग्णालयामध्ये घेऊन जात असताना शर्मा यांचा मृत्यू झाला. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खासदार रामस्वरूप शर्मा यांचं घर आतून बंद होतं. त्यांनी गळफास घेतलेला होता. पोलिसांनी सांगितलं की त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं मात्र दवाखान्यात पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

दरम्यान माहिती मिळताच केंद्रीय वित्त राज्य मंत्री अनुराग ठाकूर रामस्वरूप शर्मा यांच्या घरी पोहोचले आहेत. रामस्वरूप शर्मा यांचा जन्म 10 जून 1958 रोजी झाला होता. त्यांनी 1980 मध्ये चंपा शर्मा यांच्याशी विवाह केला होता. त्यांना तीन मुलं आहेत.

शर्मा यांना रोज सकाळी 6.30 पर्यंत जाग येत असे. आज सकाळी ते 6.30प र्यंत तो उठलेच नाहीत, तेव्हा त्यांच्या पीएने कंट्रोल रूमला कॉल केला. त्यानंतर पोलिसांनी येऊन दार तोडले. त्यावेळी कुक पीए घरात उपस्थित होते आणि कुटुंबातील उर्वरित सदस्य त्यांच्या गावी राहतात. अशीही माहिती समोर आली आहे की, 62 वर्षीय खासदार बर्‍याच दिवसांपासून आजारी होते. घटनास्थळी घरी बरीच औषधे देखील सापडली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button