बंगालमध्ये पुन्हा ‘वाघिणी’चीच सरशी!
मोदींची जादू 'फेल', ममतांचा गड अभेद्य राहणार; जनमत चाचणीचा अंदाज
नवी दिल्ली : पश्चिम बंगालसहीत पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी आज शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडलं. विधानसभा निवडणूक २०२१ चा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. तत्पूर्वी आज मतदानाची वेळ संपताच या निवडणुकीचे विविध एक्झिट पोल अर्थात जनमत चाचणी जाहीर झालेत. पश्चिम बंगालसहीत पाच राज्यांत कुणाची सत्ता स्थापन होऊ शकते, याचा अंदाज या एक्झिट पोलमधून लक्षात येऊ शकतो. जनमत चाचणीत पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचीच सत्ता स्थापन होऊ शकते, असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांकडे सर्व देशाचं लक्ष आहे. आज आलेल्या एग्जिट पोलच्या निकालामुळे अनेकांना धक्का बसला आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून बरेच प्रयत्न करीत होती. अमित शहा, नरेंद्र मोदींपासून अनेक नेते या निवडणुकीत सामील झाले होते. कोरोनाचा कहर असतानाही पश्चिम बंगालमध्ये मात्र रॅली, प्रचाराचं वातावरण होतं. मात्र तरीही पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी पुन्हा एकदा क्वीन ठरल्या आहेत. ममता दीदींच्या तृणमृलला एग्जिट पोलमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या एग्जिट पोलमध्ये ममता दीदींच्या तृणमूलला 152 ते 164 जागा मिळाल्याचं सांगण्यात आलं आहे. तर भाजपला केवळ 109-121 जागा मिळाल्या आहेत. कोणत्याही पक्षाला विजयासाठी कमीत कमी 148 जागांची गरज आहे. त्यामुळे एग्जिट पोलच्या निकालानुसार पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता दीदींचा विजय झाल्याचं समोर येत आहे.
पश्चिम बंगालमध्ये ममता बनर्जींच्या तृणमूल काँग्रेस आणि भाजप या दोघांसाठी ही निवडणूक अग्निपरीक्षेपेक्षा कमी नव्हती. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान गुरुवारी (२९ एप्रिल) सायंकाळी सहा वाजता पार पडलं. पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा निवडणुकांसाठी मतदान झालं. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आठव्या आणि शेवटच्या टप्प्यात अनेक भागात छोट्या-मोठ्या हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहे. विधानसभेच्या आठव्या आणि शेवटच्या टप्प्यात 35 जागांसाठी 11,860 मतदान केंद्रांवर मतदान पार पडलं. यामध्ये 11-11 जागा मुर्शीदाबाद आणि बीरभूम जिल्ह्यात तर सहा जागा मालदा आणि सात जागा कोलकाताच्या उत्तरेकडील आहेत. बंगालमध्ये पहिल्या टप्प्याची निवडणूक 27 मार्च रोजी सुरू झाली होती. त्याशिवाय 2 मे (रविवारी) रोजी मतमोजणी होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 जागांसाठी निवडणूक पार पडली. यात कोणत्याही पक्षाला विजयासाठी कमीत कमी 148 जागांची गरज आहे.
पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ 30 मे 2021 रोजी पूर्ण होत आहे. अशात 30 मेपासून प्रामुख्याने विधानसभा आणि नवीन सरकार गठीत करण्याची प्रक्रिया सूरू होईल. पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 विधानसभेच्या जागा आहेत. गेल्या 10 वर्षांपासून ममता बॅनर्जी येथे मुख्यमंत्रिपद सांभाळत आहेत.
ममता यांनी मतमोजणीपूर्वी बोलवली उमेदवारांची बैठक
आठव्या टप्प्यात संपन्न झालेली पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रिया आता समाप्त जाली आहे. निवडणूक संपल्यानंतर ममता बॅनर्जीने तृणमूल काँग्रेसचे नेते आणि प्रत्येक जागेवरील उमेदवारांची बैठक बोलावली. 2 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीपूर्वी ममता दीदींनीही बैठक बोलावली आहे.
पश्चिम बंगालमध्ये २९४ विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण आठ टप्प्यांत मतदान पार पडलं. बंगालमध्ये २७ मार्च, १, ६, १०, १७, २२ आणि २६ एप्रिल रोजी नागरिकांनी आपलं मत नोंदवलंय. यानंतर राज्यात पुन्हा एका तृणमूल काँग्रेस सत्ता स्थापन करणार की भाजप पश्चिम बंगालमध्ये मुसंडी मारणार? हे २ मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालातून स्पष्ट होईल.
तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात ६ मतदान रोजी मतदान पार पडलं. तामिळनाडूत एकूण ७१.४३ टक्के मतदानाची नोंद करण्यात आलीय.
आसाममध्ये तीन टप्प्यांत मतदान पार पडलं. २७ मार्च, १ एप्रिल आणि ६ एप्रिल रोजी पार पडलेल्या मतदानात जवळपास ८२.०४ टक्के मतदानाची नोंद करण्यात आलीय.
केरळमध्ये १४० विधानसभा मतदारसंघांत निवडणूक पार पडल्या. राज्यात ६ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडलं. केरळमध्ये जवळपास ७० टक्के मतदानाची नोंद झाली.
पुदुच्चेरीतही ६ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात झालेल्या मतदानात ८१.६४ टक्के मतदानाची नोंद करण्यात आलीय. काँग्रेस सरकार अल्पमतात आल्यानंतर इथे विधानसभा निवडणूक घेण्यात आल्या आहेत.
एबीपी माझा-सी व्होटरच्या एक्झिट पोलचा अंदाज
आसाममध्ये भाजपची सत्ता येण्याची चिन्हे
आसाममध्ये मतांच्या टक्केवारीत दुसऱ्या नंबरला असून देखील भाजपची सत्ता परत येण्याची चिन्ह आहेत. आसाममधील 126 विधानसभेच्या जागांपैकी भाजपला 58-71 जागा मिळतील असा अंदाज आहे, तर काँग्रेस प्रणित यूपीएला 53-66 जागा तर इतरांच्या खात्यात 0-5 जागा जाण्याची शक्यता आहे.
तामिळनाडुमध्ये भाजप-एआयएडीएमके आघाडीला मोठं नुकसान
तामिळनाडुमध्ये भाजप-एआयएडीएमके आघाडीला मोठं नुकसान होताना दिसत आहे. विधानसभेच्या एकूण 234 जागांपैकी भाजप-एआयएडीएमके आघाडी 58-70 जागा मिळतील. तर डीएमके-काँग्रेस आघाडीला 160-172 जागांवर विजय मिळेल असा अंदाज आहे तर इतरांच्या खात्यात 0 ते 7 जागा जातील असा अंदाज आहे.
पुद्दुचेरीमध्ये भाजप आघाडीला विजय मिळणार
पुद्दुचेरीमध्ये भाजप आघाडीला विजय मिळणार असल्याचा अंदाज आहे. भाजप आणि सहयोगी पक्षाला 19-23 जागा मिळू शकतात तर काँग्रेसला 6 ते 10 जागा मिळू शकतात. 30 जागा असलेल्या विधानसभेत इतर पक्षांच्या 1 ते 2 जागा येण्याची शक्यता आहे.
केरळमध्ये डाव्यांचं सरकार येण्याची शक्यता
केरळमधील निवडणुकीच्या एक्झिट पोलनुसार इथं लेफ्टचं सरकार येण्याची शक्यता आहे. राज्यातील 140 जागांपैकी 71 ते 77 जागी लेफ्ट तर काँग्रेस प्रणित यूडीएफला 62-68 जागांवर विजय मिळू शकतो. भाजपला 0 ते 2 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे.
पश्चिम बंगालचा एक्झिट पोल (292 जागा)
TMC+ : 152-164
BJP+ : 109-121
CONG+ : 14-25
२ संस्थांच्या पोल्सने बंगालमध्ये दाखवला भाजपचा विजय
बहुतेक सर्व संस्थांनी मतदानोत्तर चाचणीत बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला आघाडीवर दाखवलं आहे. मोदींची जादू बंगालमध्ये चालली नाही, असंच मतदानोत्तर चाचणीत दिसत आहे. अपवाद फक्त रिपब्लिक सीएनएक्स आणि जन की बात या दोन सर्वेक्षणांचा. या दोन संस्थांनी भाजपला बंगालमध्ये तृणमूलपेक्षा अधिक जागा दिल्या आहेत.
रिपब्लिक सीएनएक्सच्या सर्वेक्षणानुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला 128 ते 132 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर भाजपला 38-148 आणि डाव्यांसह इतर पक्षांना 11-21 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
जन की बात या एक्झिट पोलमध्ये भाजपला 152 – 164 जागा दाखवण्यात आल्या आहेत. तृणमूलला 104 ते 121 जागा दाखवण्यात आल्या आहेत.
टीव्ही 9- पोलस्ट्राटचा एक्झिट पोल
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची हॅटट्रिक जवळपास निश्चित असून तृणमूल काँग्रेस एकहाती सत्ता स्थापन करण्याची चिन्हं आहेत. आसाममध्ये सत्ताधारी भाजपसमोर काँग्रेसचं कडवं आव्हान, इथे काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. तामिळनाडूत मोठा उलटफेर होत असून, सत्ताधारी एआयडीएमके ला मोठा झटका बसण्याचे संकेत आहेत. डीएमके एकहाती सत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. केरळमध्ये सत्ताधारी LDF पुन्हा डाव मांडण्याची चिन्हं, एक्झिटपोलमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर पुद्दुचेरीमध्ये काँग्रेसला झटका बसण्याचे संकेत असून भाजप सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालमध्ये कुणाला किती जागा?
तृणमूल (TMC) – 142 ते 152
भाजप (BJP) – 125 to 135
डावे + काँग्रेस (LEFT+ Congress) – 16 to 26
अन्य (OTH) –
एकूण – 292
आसाम एग्झिट पोल
NDA – 59 ते 69
UPA – 55 ते 65
अन्य – 1 ते 3
एकूण – 126
केरळमध्ये कुणाला किती जागा?
LDF – 70 ते 80 जागा
UDF – 59 ते 69 जागा
NDA – 0 ते 2 जागा
एकूण – 140
तामिळनाडूत कुणाला किती जागा?
डीएमके (DMK) – 143 ते 153
एआयडीएमके (AIDMK) – 75 ते 85
अन्य – 02 ते 12
एकूण – 234
आसाममध्ये काट्याची टक्कर
आसाममध्ये काट्याची टक्कर असल्याचं दिसतंय. कारण आसाममध्ये टीव्ही 9- पोलस्ट्राट एक्झिट पोलनुसार एनडीए आणि यूपीएमध्ये जोरदार फाईट होत आहे. आसाममधील एकूण 126 जागांपैकी भाजपप्रणित NDA ला 59 ते 69, तर काँग्रेसप्रणित UPA ला 55 ते 65 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
एबीपीच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस वरचढ
पाश्चिम बंगाल
टीएमसी – 152 – 164
भाजपा – 109 – 121
काँग्रेस – 14 – 25
टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार तृणमूलला कौल
पश्चिम बंगाल
टीएमसी – 128 – 138
भाजपा – 138 – 148
डावे – 11 – 21