Top Newsराजकारण

मोदी सरकारकडून देशाच्या सुरक्षेचे राजकारण : राहुल गांधी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात दहशतवादविरोधी पथकाने दहशतवाद्यांना अटक मोठा कट उधळून लावल्यानंतर आता देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच जम्मू-काश्मीरमध्येही काही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. यावरून आता काँग्रेसने मोदी सरकारवर टीका केली असून, भारत एवढा असुरक्षित यापूर्वी कधीच नव्हता, असा मोठा आरोप केला आहे.

देशातील कोरोनाची परिस्थिती, कोरोना लसीकरण मोहीम, लसींची टंचाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ, महागाई यांवरून सातत्याने केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी टीका करताना दिसत आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर मोठी टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी एक ट्विट केले असून, मोदी सरकारने परराष्ट्र आणइ संरक्षण धोरणाचे राजकारण करून देशाला कमकुवत करण्याचे काम केले. भारत एवढा असुरक्षित कधीच नव्हता, असा मोठा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावरूनही राहुल गांधी यांनी टीका केली होती. मंत्र्यांची संख्या वाढली आहे, कोरोना लसीची नाही, असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button