Top Newsराजकारण

शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या यांना मानसिक धक्का !

निवेदन स्वीकारण्यास सोमय्यांनी नकार दिल्याने शिवसैनिक आक्रमक

पुणे : किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महानगरपालिकेमध्ये जो हल्ला झाला त्यामुळे त्यांना मानसिक धक्का बसलेला आहे. तसेच त्यांच्यावर अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्यांचा रक्तदाब वाढला होता. संचेती हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केल्यानंतर त्यांचा बीपी सातत्याने वाढत होता. मात्र, आता बीपी कंट्रोलमध्ये आला आहे. त्यांना मानसिक धक्का बसल्यामुळे त्याचा बीपीवर परिणाम झाला, असे संचेती हॉस्पिटलचे डॉ. पराग संचेती यांनी सांगितले आहे.

शिवसैनिकांनी हल्ला केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. या ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यक उपचारही करण्यात आले. यानंतर संचेती हॉस्पिटलचे डॉ. पराग संचेती यांनी किरीट सोमय्या यांच्या प्रकृतीविषयी माध्यमांना माहिती दिली. यात त्यांनी अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सोमय्या यांना मानसिक धक्का बसल्याचं सांगितलं. या धक्काबुक्कीमध्ये सोमय्या महानगरपालिकेच्या पायर्‍यांवर पडले होते. ते पाठीवर पडले आणि त्यामुळे त्यांनी उजव्या हाताचा आधार घेतला होता. या उजव्या हाताला मुका मार लागलेला आहे. त्यांना एक दिवस संचेती हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखी खाली ठेवण्यात येणार आहे, असंही डॉ. पराग संचेती यांनी नमूद केलं.

किरीट सोमय्या शनिवारी (५ फेब्रुवारी) आधी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गेले. तिथे त्यांनी पुणे जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. यानंतर सोमय्या तेथून पुणे महानगरपालिकेत आयुक्तांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना निवेदन स्वीकारण्याची मागणी केली. मात्र, सोमय्यांनी हे निवेदन स्विकारलं नाही. यावर आक्रमक शिवसेना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button