राजकारण
महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकीचे पत्र महापौर बंगला येथे आले आहे. पेडणेकर यांच्या कुटूंबियांना देखील धमकी देण्यात आली आहे. याबाबत भायखळा पोलीस अधिक तपास करत आहेत.
महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र बंगल्यावरआले, या पत्रात अश्लील भाषेत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून ‘माझ्या दादांच्या नादाला लागू नका आणि घरच्यांनाही गोळ्या घालून मारू ‘अशी धमकी देण्यात आली आहे.