राजकारण

मराठा समाजाचं ठरलं! १६ तारखेपासून पुन्हा मोर्चे, पहिल्या मोर्चाचं ठिकाणही ठरलं!

बीड : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाने पुन्हा मोर्चे काढण्याचा निर्धार केला आहे. बीडमध्ये आज मराठा आरक्षण संदर्भातील बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊन संपल्यावर १६ मे पासून मोर्चा काढण्यावर एकमत झालं. बीडमधून पहिला मोर्चा काढला जाणार आहे. उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. हे मोर्चे राज्यभरात काढण्यात येतील, अशी माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली.

सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर बीडमध्ये या संदर्भातील बैठक घेण्यात आली. मराठा आरक्षणासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना उद्या देण्याचा निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊन संपल्यावर १६ तारखेला मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. मराठा संघटनांनी घेतलेल्या या भूमिकेकमुळं राज्य सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यभरात मोर्चे काढणार असल्याची माहिती यावेळी विनायक मेटे यांनी दिली. पहिल्या मोर्चा मोर्चाची सुरुवात बीडमधून होणार आहे.

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांनी राजीनामा द्यावा. मराठे गप्प बसणार नाहीत, रस्त्यावर उतरतील, असा इशारा शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर दिला होता.

विनोद पाटील पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार
मराठा आरक्षणासाठी लढणारे औरंगाबाद येथील विनोद पाटील पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणार आहेत. विनोद पाटील सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहेत. या याचिकेद्वारे नवीन मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचं विनोद पाटील यांनी सांगितलं. इतर राज्यातील आरक्षणाची स्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणणार आहे. इतर राज्याच्या धर्तीवर आरक्षणाची मागणी करणार असल्याची माहिती विनोद पाटील यांनी दिली. सुप्रीम कोर्टानं निकाल जाहीर केल्यानंतर तीस दिवसांच्या आत पुनर्विचार याचिका दाखल करावी लागते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button