ठाकरे सरकारच्या निव्वळ घोषणाबाजीमुळे ओबीसींचे नुकसान; भाजपची टीका

मुंबई: मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. यानंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत आरोप-प्रत्यारोप सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपने पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकावर टीका केली असून, सरकार केवळ घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले, अशी टीका करण्यात आली आहे.
ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याला ठाकरे सरकार जबाबदार असल्याची टीका करण्यात येत आहे. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. हे आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध मुद्यांवर केंद्र सरकारविरोधात महात्मा फुले समता परिषद व ओबीसी संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.
'आघाडीतल्या मंत्र्याच्या केवळ घोषणा प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान'@keshavupadhye @BJP4Maharashtra #obcreservation https://t.co/4V4NEoRzl5
— महा MTB (@TheMahaMTB) June 22, 2021
राज्यातील आघाडी सरकारच्या अपयशामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. ज्या जिल्हा परिषदांची केस होती तेथे आता पोटनिवडणूका लागल्या. विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले. प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.




