फोकस

वरळीत लिफ्ट कोसळून ४ ठार

मुंबई : वरळीच्या हनुमान गल्लीमध्ये एका इमारतीची लिफ्ट कोसळून ४ जणांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी आहे. ललित अंबिका असं या इमारतीचं नाव आहे. बीडीडी चाळ नंबर ११८, ११९ च्या समोर ही इमारत आहे. या इमारतीचं अद्याप काम सुरु आहे.

मृतांमध्ये अविनाश दास (३५ वर्षे), भारत मंडल (२७ वर्षे), चिन्मय मंडल (३३ वर्षे) आणि एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. तर लक्ष्मण मंडल (३५ वर्षे) ही व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.

ही घटना संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली असून, घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून मदतकार्य सुरू आहे. दरम्यान, अजूनही ६ जण आतमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने केईएम रुग्णालय आणि नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या इमारतीत पार्किंगचे बांधकाम सुरू होते. त्याच दरम्यान लिफ्ट कोसळली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button