राजकारण

परकीय चलन तस्करीत केरळच्या मुख्यमंत्र्यांचा हात?

तिरुवनंतपुरम : केरळमधील सोने तस्करीतील मुख्य आरोपी स्वप्ना सुरेश याने केरळच्या मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे. परकीय चलन तस्करीत राज्याचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांचा हात असल्याचे म्हटले आहे़ ही माहिती कस्टम आयुक्त सुमित कुमार यांनी केरळ उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान दिली आहे. यावेळी कुमार यांनी उच्च न्यायालयात निवेदनाद्वारे म्हटले आहे की, सोने तस्कर आरोपी स्वप्ना सुरेशने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

याशिवाय स्वप्ना यांनी केरळ विधानसभा अध्यक्ष आणि तीन कॅबिनेट मंत्र्यांवर परकीय चलन तस्करीचा आरोप लावला आहे. ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर हे आरोप केल्याने सत्ताधारी पक्षासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहे. अनेक राजकीय नेत्यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली मुख्यमंत्र्यांना पुरते घेरले आहे़ सध्या केरळमध्ये गोल्ड रॅकेट प्रकरणाची चौकशी पाच केंद्रीय तपास यंत्रणांकडून केली जात आहे. मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्या म्हणण्यानुसार, हा तपास राजकीय षडयंत्राचा एक भाग आहे.

सीएमचे स्वप्ना सुरेशशी निकटचे संबंध
कस्टम आयुक्तांनी असेही सांगितले की, स्वप्ना सुरेशचे सीएम विजयन आणि त्यांचे माजी मुख्य सचिव यांच्याशी निकटचे संबंध आहेत. यापूर्वी केरळमधील विरोधी पक्ष यूडीएफनेही पिनारायी विजयन यांच्याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. जानेवारीत सभागृहात यूडीएफने म्हटले होते की, सोन्याच्या तस्करीसारख्या प्रकरणात मुख्यमंत्री कार्यालय संशयाच्या भोव-यात सापडणे, हे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button