काश्मीरमधील फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचे निधन
श्रीनगर : हुरियत कॉन्फरन्स (जी) चे माजी अध्यक्ष आणि फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. बुधवारी रात्री साडेदहा वाजता श्रीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी ट्वीट करून त्यांना आदरांजली वाहिली.
मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, गिलानी यांच्या निधनाच्या बातमीनं दु: खी झाले. आम्ही बर्याच गोष्टींवर सहमत होऊ शकलो नाही परंतु मी ठामपणे आणि दृढ विश्वास ठेवल्याबद्दल मी त्यांचा आदर करतो. अल्लाह त्याला नंदनवन देवो आणि त्याच्या कुटुंबियांना आणि हितचिंतकांना संवेदना देवो अशा शब्दात मेहबुबा मुफ्तींनी भावना व्यक्त केल्या आहेत.
गिलानी बराच काळ आजारी होते आणि २००८ पासून त्यांच्या हैदरपोरा निवासस्थानी नजरकैदेत होते. गेल्या वर्षी त्यांनी हुरियत कॉन्फरन्स (जी) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सय्यद अली शाह गिलानी यांचा जन्म २९ सप्टेंबर १९२९ रोजी झाला. ते जम्मू -काश्मीरचे फुटीरतावादी नेते होते. ते आधी जमात-ए-इस्लामी काश्मीरचे सदस्य होते पण नंतर तेहरिक-ए-हुर्रियतची स्थापना केली. त्यांनी जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी पक्षांचा गट ऑल पार्टीज हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष म्हणून काम केले, १९७२, १९७७ आणि १९८७ मध्ये जम्मू -काश्मीरच्या सोपोर मतदारसंघातून आमदार होते. त्यांनी जून २०२० मध्ये हुर्रियत कॉन्फरन्सचे प्रमुखपद सोडले.