अर्थ-उद्योगआरोग्य

अंबड एमआयडीसीतील जम्बो कोविड हॉस्पिटलची नाशिक मनपा आयुक्तांकडून पाहणी

नाशिक : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आयामांच्या पुढाकाराने सीएसआर उपक्रमामधून अंबड औद्योगिक वसाहतीत होणाऱ्या जम्बो कोविड हॉस्पिटलची पाहणी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी केली व सदर कामाचा आढावा घेतला. आयामाने याकामी पुढाकार घेऊन येऊ घातलेल्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर या हॉस्पिटलची उभारणी होणार आहे. याकामासाठी महिंद्रा अँड महिंद्रा, टीडीके, लुसि इलेक्ट्रिक आदी उद्योगाच्या मदतीने या कोविड सेंटरची उभारणी होणार आहे. यात गाद्या, बेड, ऑक्सिजन प्लांट, कॉन्सन्ट्रेटर, टेबल व इतर साहित्याची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती अंबड इंडस्ट्रीज अँड मॅनुफॅक्टरर्स असोसिएशनचे सरचिटणीस ललित बुब यांनी दिली.

आयामा रिक्रिएशन सेंटर येथील के. आर. बुब कॉन्फरन्स हॉलमध्ये झालेल्या या बैठकीत महानगरपालिका, एमआयडीसी, डीआयसी, आयामांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, आयामा विश्वस्त समिती चेअरमन धनंजय बेळे, उपाध्यक्ष निखिल पांचाळ, सुदर्शन डोंगरे, आयपीपी राजेंद्र अहिरे, सचिव राजेंद्र पानसरे, गोविन्द झा, राजेंद्र कोठावदे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button