आरोग्य

कोरोनाचा कहर कायम! राज्यात पुन्हा ६० हजारांहून अधिक नवे रुग्ण

मुंबई : कोरोनाला थोपविण्यासाठी बुधवारपासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीला १ दिवस पूर्ण झाला आहे. पण राज्यात अजूनही कोरोनाचा कहर कायम आहे. बुधवारी राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित घट झाल्याचे पाहायला मिळाले होते. पण आज पुन्हा एकदा नवीन कोरोनाबाधितांची संख्या ६० हजार पार गेली आहे. गेल्या २४ तासांत ६१ हजार ६९५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३४९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३६ लाख ३९ हजार ८५५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५९ हजार १५३ जणांचा मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात राज्यात ५३ हजार ३३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण २९ लाख ५९ हजार ५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.३ एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६३% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ३० लाख ३६ हजार ६५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३६ लाख ३९ हजार ८५५ (१५.८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५ लाख ८७ हजार ४७८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २७ हजार २७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजरोजी एकूण ६ लाख २० हजार ६० Active रुग्ण आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button