
टोक्यो : भारताच्या भाविना पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक टेबल टेनिस क्लास ४ स्पर्धेत रौप्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. टोक्यो पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे. अंतिम फेरीत भाविनाचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या झोउ यिंगशी झाला. यिंगने जेतेपदाच्या लढतीत भाविनाचा ३-० असा पराभव केला. टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी भाविना पहिली खेळाडू ठरली आहे. पराभव होऊनही भाविनाने आपल्या खेळाने मने जिंकली आहेत. ३४ वर्षीय भाविनाने शनिवारी क्लास ४च्या उपांत्य फेरीत चीनच्या मियाओ झांगचा ३-२ असा पराभव केला होता. भाविनाने भारतीय शिबिरातील सर्वांना चकित करून जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ७-११, ११-७, ११-४, ९-११, ११-८ ने पराभूत केले होते.
https://twitter.com/ParalympicIndia/status/1431806650466197510
गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात लहान किराणा दुकान चालवणाऱ्या हसमुखभाई पटेल यांची मुलगी असलेली भाविना सुवर्ण पदकाची दावेदार मानली जात होती पण अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूनकडून पराभव झाल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. भाविनाच्या या उत्कृष्ट कामगिरीने कामगिरीने इतिहास रचला आहे.