इंग्लंडविरुद्धच्या वन-डे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णाला संधी
मुंबई : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी पहिल्यांदाच संघात सूर्यकुमार यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांची निवड करण्यात आली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत शानदार खेळी करणाऱ्या मोहम्मद सिराजला देखील संधी मिळाली आहे.
इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी जसप्रीत बुमराहला आराम देण्यात आला आहे. संघात पाच वेगवान गोलंदाजांना संधी मिळाली आहे. भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश आहे.
आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केलेल्या सू्र्यकुमार यादवला इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत संघात स्थान मिळालं आहे. सू्र्यकुमारनं चौथ्या टी20 मध्ये शानदार 57 धावांची खेळी केली होती. एकदिवसीय मालिकेत फलंदाजीमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल आणि शुभमन गिल यांचा तर विकेटकिपर म्हणून ऋषभ पंतला संधी मिळाली आहे.
भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, केएल राहुल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, क्रुणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, मो. सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर.
एकदिवसीय सामन्यांचे वेळापत्रक
– पहिली वनडे- 23 मार्च (पुणे)
– दुसरी वनडे- 26 मार्च (पुणे)
– तिसरी वनडे- 28 मार्च (पुणे)