स्पोर्ट्स

दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडियाकडे ८९ धावांची आघाडी; रिषभ पंतचे खणखणीत शतक

अहमदाबाद : रिषभ पंतचे खणखणीत शतक, तसेच वॉशिंग्टन सुंदरने केलेल्या नाबाद अर्धशतकामुळे इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताला मोठी आघाडी मिळाली. या सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांत आटोपला होता. याचे उत्तर देताना दुसऱ्या दिवसअखेर भारताची ७ बाद २९४ अशी धावसंख्या होती. त्यामुळे भारताकडे ८९ धावांची आघाडी होती. या कसोटीचा दुसरा दिवस भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतसाठी खास ठरला. त्याने ११८ चेंडूत १३ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने १०१ धावांची खेळी केली. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील तिसरे आणि भारतातील पहिलेच शतक ठरले. त्याला वॉशिंग्टन सुंदरने उत्तम साथ लाभली. दिवसअखेर तो ६० धावांवर नाबाद होता. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने तीन, तर बेन स्टोक्स आणि जॅक लिच यांनी दोन-दोन विकेट घेतल्या.

दुसऱ्या दिवशी भारताने १ बाद २४ वरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. चेतेश्वर पुजारा (१७) आणि कर्णधार विराट कोहली (०) यांना फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. अजिंक्य रहाणेने काही चांगले फटके मारत ४५ चेंडूत २७ धावा केल्यावर त्याला जेम्स अँडरसनने बाद केले. यानंतर रोहित शर्मा आणि पंत यांनी ४१ धावांची भागीदारी रचत भारताचा डाव सावरला. रोहितचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. त्याला ४९ धावांवर बेन स्टोक्सने पायचीत पकडले. परंतु, पंत आणि सुंदर यांनी ११३ धावांची भागीदारी रचत भारताचा डाव सावरला. पंतने ११५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. मात्र, तो १०१ धावांवर बाद झाला. अखेर सुंदर (नाबाद ६०) आणि अक्षर पटेल (नाबाद ११) यांनी चांगली फलंदाजी केल्याने भारताने आणखी विकेट गमावली नाही.

पंत-सुंदरची निर्णायक भागीदारी
रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदरने टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी शतकी भागादीर केली. या दोघांमध्ये 7 व्या विकेटसाठी 158 चेंडूत 113 धावांची भागीदारी झाली. ही भागीदारी टर्निंग पाईंट ठरला. या दरम्या पंतने आपलं शतक पूर्ण केलं. रिषभच्या कारकिर्दीतील हे तिसरं तर भारतातील पहिलं शतक ठरलं.

रिषभ पंतच्या निडरपणावर चाहते फिदा
सामन्याचा दुसरा दिवस भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतसाठी खास ठरला. पंतने भारताच्या पहिल्या डावात ११८ चेंडूत १०१ धावांची खेळी केली. पंतचे कसोटी क्रिकेटमधील एकूण तिसरे आणि भारतातील पहिलेच शतक ठरले. पंतने डावाच्या सुरुवातीला सावध खेळ केला होता. त्याने अर्धशतक पूर्ण करण्यासाठी ८२ चेंडू घेतले. मात्र, पुढील ५० धावा त्याने अवघ्या ३३ चेंडूतच केल्या. त्यामुळे त्याने ११५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीत १३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. तसेच त्याने निडरपणे खेळ करत जो रूटच्या गोलंदाजीवर षटकार मारत आपले शतक पूर्ण केले. त्याच्या या निडरपणावर चाहते फिदा झाले आणि त्यांनी त्याची तुलना भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागसोबत केली.

सेहवागनेही केले कौतुक
सेहवाग कसोटी क्रिकेटमध्येही फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जायचा. त्याच्याप्रमाणेच दिल्लीकर असणारा पंतही आक्रमक शैलीत फलंदाजी करत गोलंदाजांवर दबाव टाकण्यासाठी ओळखला जातो. त्याने इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीत आपले शतक षटकार मारत पूर्ण केले. तसेच त्याने वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप मारत चौकारही लगावला. त्यामुळे स्वतः सेहवागनेही पंतचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button