भारताचा पहिला फिनटेक-फोकस्ड ग्रोथ कॅपिटल फंड ‘बीम्स फिनटेक फंड’ लॉन्च
मुंबई : भारतातील पहिला डेडिकेटेड ग्रोथ कॅपिटल फिनटेक फंड, बीम्स फिनटेक फंड (बीम्स) बाजारात आला आहे. वित्तीय सेवा व तंत्रज्ञान यांचा मिलाफ साधणाऱ्या फिनटेक कंपन्यांमध्ये हा फंड गुंतवणूक करेल. व्हेंचर कॅटालिस्ट या भारतातील पहिल्या व सर्वांत मोठ्या एकात्मिक इनक्युबेटरद्वारे बीम्स हा फंड लॉन्च केला जात आहे. यामध्ये ९युनिकॉर्न्स या सुरुवातीच्या टप्प्यावरील १०० दशलक्ष डॉलर्स मूल्याच्या सर्व विभागातील जलद गतीने वाढणाऱ्या फंडांचा समावेश आहे.
१०० दशलक्ष डॉलर्स आकारमानाचे लक्ष्य असलेल्या तसेच ग्रीनशू (ओव्हर अलॉटमेंट) पर्याय असलेल्या बीम्सने, फिनटेक कंपन्यांच्या वाढीच्या टप्प्यावर, सीरिज बी अँड सीमध्ये, ८ ते १० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. उच्च दर्जाच्या संस्थापकांच्या नेतृत्वाखालील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा फंडाचा प्रस्ताव आहे. सध्या बाजारात ७५ अब्ज डॉलर्सपर्यंत मूल्य असलेल्या व २०२५ पर्यंत २०० अब्ज डॉलर्सहून अधिक मूल्याला स्पर्श करण्याची संभाव्यता असलेल्या डझनभर फिनटेक कंपन्यांचा केंद्रित पोर्टफोलिओ तयार करण्याची फंडाची योजना आहे.
बीम्सची स्थापना फिनटेक क्षेत्रातील अनुभवी सागर अगरवाल आणि डॉ. अपूर्व रंजन शर्मा, अनुज गोलेचा, अनिल जैन, गौरव जैन यांचा समावेश आहे. फिनटेक कन्व्हर्जन्स कौन्सिलचे अध्यक्ष आणि इत्झकॅशचे (आता एबिक्सइंक) संस्थापक नवीन सूर्या यांची नियुक्ती फिनटेक एक्स्पर्ट पार्टनर (अकार्यकारी) म्हणून करण्यात आली आहे. हा प्रमुख संस्थापक टीमचा भाग आहे.
बीम्सचे सहसंस्थापक व भागीदार सागर अगरवाल म्हणाले, “फिनटेक सॉफ्टवेअरमधील मोठ्या भागाचे ग्रहण करत आहे. आम्ही आता भारतात फिनटेक ३.० मध्ये आहोत. कर्जपुरवठा व पेमेंट्सच्या पहिल्या लाटेत कंपन्यांना लक्षणीय भांडवल प्राप्त झाले आहे आणि आता सर्व विभागांमध्ये भांडवल फिरत आहे. मुरलेले व्यावसायिक आणि उच्च दर्जाचे संस्थापक मोठ्या फर्म्समधून बाहेर पडून नवीन प्रवर्गांना लक्ष्य करत आहेत आणि त्याद्वारे भारतातील वित्तीय सेवांच्या न संपणाऱ्या मागण्यांची पूर्तता करत आहे.”
बीम्सचे सहसंस्थापक आणि इन्व्हेस्टमेंट कमिटीचे सदस्य डॉ. अपूर्व शर्मा म्हणाले, “आम्ही गुंतवणूकदारांची भक्कम सिद्धांताद्वारे चालणारी टीम आहोत आणि कोविड साथीमुळे फिनटेक क्षेत्रातील आमचा सिद्धांत अधिक मजबूत झाला आहे. भारतात पुढील ५-७ वर्षांमध्ये सध्याच्या व नवीन फिनटेक्सद्वारे सुमारे २०० अब्ज डॉलर्सपर्यंत नवीन मूल्य निर्माण होईल, असे आम्हाला अपेक्षित आहे. बीम्स प्रामुख्याने एम्बेडेड वित्त, एंटरप्राइज सास (SAAS) उत्पादने, निओ बँक्स आणि एमएसएमईंना सेवा देणाऱ्या प्लॅटफॉर्म्सवर लक्ष केंद्रित करणार आहे.”
बीम्सचे सहसंस्थापक आणि पार्टनर अनुज गोलेचा म्हणाले, “भारतात फिनटेक क्षेत्रात खूप संधी आहे, कारण ७५ अब्ज डॉलर्स मूल्य तसेच ८ अब्ज डॉलर्स एमअँडए तयार करणारा हा भारतातील एकमेव तंत्रज्ञान विभाग आहे. भारतपेमध्ये आम्हाला मिळालेले उत्पन्न हा भारतातील फिनटेक क्षेत्रातील संधीचा पुरावा आहे. भारतपे एक्झिटमधून आम्ही गुंतवणूकदारांना ९० पट मोबदला मिळवून दिला. या कंपनीचे गेल्या वर्षी युनिकॉर्नमध्ये रूपांतर झाले आणि या क्षेत्रात अधिकाधिक युनिकॉर्न निर्माण होत आहे. आमच्याकडे उत्तम ट्रॅक रेकॉर्डसह भारतातील सर्वोत्तम फिनटेक गुंतवणूक टीम्सपैकी एक आहे.”
बीम्सच्या संस्थापक टीमकडे, गुंतवणुकीचा आणि २५० हून अधिक कंपन्या उभारण्याचा, २० वर्षांहून अधिक अविश्वसनीय अनुभव आहे. या कंपन्यांमध्ये भारतपे, दुकान, फ्लोबिझ, एसके, इम्पॅक्ट गुरू, सुर्योदय, सेंट्रिम, ओटीओ कॅपिटल, क्लब, गेटव्हाण्टेज, लेनडेनक्लब, लिक्विलोन्स आणि ज्युनिओ या कंपन्यांचा समावेश आहे.