लाईफस्टाईल

मदामेच्या ऑनलाइन वेस्टर्न विमेन्सवेअरच्या विक्रीमध्ये वाढ

मुंबई : मदामे या महिलांसाठी अॅपरल, हँडबॅग, फूटवेअर व अॅक्सेसरीज यासाठीच्या भारतातील आघाडीच्या विमेन्स वेस्टर्न वेअर फॅशन ब्रँडने 2020 मधील महामारीच्या काळादरम्यान ऑनलाइन विक्रीमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली आहे. ऑनलाइन विक्रीमध्ये एकूण विक्रीच्या 2% वरून जवळजवळ 10% पर्यंत वाढ झाली. टिअर II व टिअर III शहरांमध्ये झालेल्या वाढीमुळे यामध्ये मोलाचे योगदान मिळाले. लुधियाना, लखनौ, जयपूर, मोहाली, नोएडा, जम्मू व शिमला अशा शहरांमध्ये या ब्रँडसाठी मोठी वाढ दिसून आली. निरनिराळ्या फॅशनद्वारे महिलांना त्यांचे वेगळेपण व प्रेरणा व्यक्त करता यावी, यासाठी मदामे सातत्याने प्रयत्नशील आहे. नजिकच्या काळामध्ये, या ब्रँडने गॅल गॅडॉटची मुख्य भूमिका असलेल्या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने, वॉर्नर ब्रदर्सच्या सहयोगाने वंडर विमेनपासूनप्रेरित कलेक्शन सादर केले.

www.glamly.com, या ऑनलाइन सुविधेवर महत्त्वाचे बदल आणि सुधारणा राबवण्यात आल्याने मदामेने ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यात सातत्य राखले आहे. 2025 पर्यंत विक्रीमध्ये तिप्पट वाढ होईल, अशी मदामेची अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय ग्राहकांसाठी वस्तू अधिक वेगाने पोहोचत्या करण्याची, तसेच पुरवठा साखळी अधिक सक्षम करण्याची गरज या ब्रँडने व्यक्त केली आहे. भविष्यामध्ये, कंपनीला मिळणाऱ्या उत्पन्नापैकी बहुतेकसे उत्पन्न केवळ ऑनलाइन विक्रीद्वारे मिळणार आहे.

मदामेच्या ईकॉमर्सचे प्रमुख शाल्वी गोविल यांनी सांगितले, “महामारीमुळे अनेकांनी ऑनलाइन खरेदीला पसंती दिली आहे. डिजिटल मार्केटमध्ये विस्तार करण्यासाठी मदामेने उत्तम धोरण आखले होते. ग्राहकांचे तपशीलवार संशोधन केल्यावर विविध ठिकाणी आपल्या सेवेचा विस्तार केला. आमच्या ब्रँडसाठी मागणी मोठी आहे. आम्ही चांगली सेवा दिली तर आम्हाला झटपट बाजारहिस्सा मिळवता येऊ शकतो, असे आमच्या लक्षात आले. टिअर II व टिअर III शहरांतून प्रचंड मागणी असून त्यांच्या आकांक्षाही मोठ्या शहरांतल्या ग्राहकांसारख्याच आहेत. मदामे त्यांना फॅशनद्वारे स्वतःला वैशिष्ट्यपूर्ण व्यक्त करण्याची संधी देते”. सध्या, मदामेच्या www.glamly.com या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटच्या ग्राहकांना त्यांनी खरेदी केलेल्या वस्तू खरेदी केल्यापासून दोन दिवसांमध्ये मिळतात. मंत्रा, अॅमेझॉन व आजीओ या अन्य वेबासाइट मदामेच्या ऑनलाइन विक्रीमध्ये योगदान देतात. हा ब्रँड भारतातील 500+ रिटेल आउटलेटमध्ये उपलब्ध आहे.

मार्केटिंग व कम्युनिकेशन्स संचालक सुमेधा जैन यांनी नमूद केले, “मदामे आकर्षक व आरामदायी कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे कपडे वेबसाइटवर आकर्षकरित्या सादर केले जातात आणि ब्रँडच्या विचारसरणीचे प्रतिनिधीत्व करतात. कोणतीही तडजोड न करण्याचे आमचे धोरण असून, आमची वेबसाइट दर्जेदार कण्टेण्ट उपलब्ध करते आणि त्यातून नवे ट्रेंड दर्शवते. काही उत्पादनांच्या चित्रांमध्ये आरामदायीपणा व धमाल यांचे घटकही दाखवले आहेत. त्यामुळे ग्राहकांना ऑनलाइन माध्यमातूनही हा ब्रँड जवळचा वाटतो. आमच्या हंगामी कलेक्शनच्या व्यतिरिक्त, वेबसाइटवर इमेजेसचा समावेश केला असून त्यामध्ये वंडर वुमन व व्हॅलंटाइन थीम अशा विशेष कलेक्शनमधल्या मॉडेलचाही समावेश केला आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत आमच्या एकूण विक्रीमध्ये ऑनलाइन विक्रीचे योगदान 15% पर्यंत राहील, अशी आमची अपेक्षा आहे”. मदामे ऑफलाइन स्टोअर्सद्वारे, तसेच ऑनलाइन व ऑफलाइन सेल्स पॉइंटची सांगड घालून मार्केटिंगमध्ये विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button