आरोग्यइतर

नाशिकमधील हाहाःकार; मृतांचा आकडा २४ वर

नाशिक : नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवारी झालेली ऑक्सिजन गळती आणि त्यामुळे २४ रुग्ण दगावल्याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ऑक्सिजन गळतीस हलगर्जीपणा कारणीभूत असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे FIR मध्ये म्हटले आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

हॉस्पिटलमधील ऑक्सिजन टाकीला गळती लागल्यामुळे अचानकपणे रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला. त्यामुळे तब्बल २४ रुग्णांचा गुदमरून अंत झाल्याची अतिशय दुर्दैवी घटना घडली. यात १२ पुरुष आणि १२ महिलांचा समावेश आहे. दरम्यान, अचानक आलेल्या या संकटामुळे हॉस्पिटलमध्ये एकच हाहा:कार उडाला.

दरम्यान, झाकीर हुसेन रुग्णालय दुर्घटना प्रकरणी राज्य सरकारने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून त्याचा अहवाल सादर करण्यात आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button