आरोग्य
देशात कोरोनाचा महाउद्रेक : एका दिवसात प्रथमच ३.७९ लाख नवे रुग्ण; ३६४५ रुग्णांचा मृत्यू
नवी दिल्ली : देशात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दरदिवशी नवे उच्चांक गाठत आहे. दुसऱ्या लाटेमुळे मृत्यूदरातही मोठी वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ३,७९,२५७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर ३६४५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, २,६९,५०७ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी मंगळवारी देशात ३,६०,९६० कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती.
एक वेळ अशी होती की, ज्यावेळी देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढू लागली होती. यावर्षी १ फेब्रुवारी रोजी देशात ८,६३५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. एका दिवसात नोंद करण्यात आलेली कोरोनाबाधितांची ही संख्या या वर्षातील सर्वात कमी होती.