
नवी दिल्ली – जगात कोरोनाचे थैमान पाहायला मिळत आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. तिसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.
गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ४४,८७७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४24 तासांत कोरोनाचे ४४ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले, . तर ६८४ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे देशभरात ५,०८,६६५ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी ५,३७,०४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
देश कोरोना संकटाचा सामना करत असून कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. याच दरम्यान लसीच्या साईड इफेक्टची देखील चर्चा रंगली होती. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर साईड इफेक्ट्समुळे झालेल्या मृतांचा आकडा आता समोर आला आहे. अँटी-कोविड-१९ लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर विपरित परिणामांच्या घटनांमध्ये १६७ लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी शुक्रवारी लोकसभेत ही माहिती दिली. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली आहे. अशी सर्वाधिक ४३ प्रकरणे केरळमध्ये झाल्याची माहिती भारती पवार यांनी सभागृहात दिली.




