गुरु गोबिंद सिंग तंत्रनिकेतनमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात

नाशिक : गुरु गोबिंद सिंग फाऊंडेशन संचलित गुरु गोबिंद सिंग तंत्रनिकेतनमध्ये ग्रंथालय विभागाने आयोजित केलेल्या वाचन प्रेरणा दिन (ए.पी.जे अब्दुल कलाम जन्म दिन) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. परमिंदर सिंग व तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा. श्रीहरि उपासनी यांच्या मार्गदर्शनाने झाली. प्राचार्य उपासनी यांनी जीवनात वाचण्याचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष सरदार बलबीर सिंग छाबरा यांनी वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी ग्रंथालय विभागात समर्थ बुक डेपो नाशिक यांच्यातर्फे बुक प्रदर्शन आयोजित करण्यात आले. वाचकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला.
ग्रंथालय विभाग प्रमुख ए. एल. भालेराव यांनी वाचन प्रेरणा दिनामागील पार्श्वभूमी सांगण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगी विभाग प्रमुख प्रा. सुषमा कोल्हे, प्रा. अशिता शांडिल्या, प्रा. गायत्री जगताप, प्रा. विलास धगाटे, प्रा. प्रशांत चव्हाण, प्रा. स्वप्नील पाटील तसेच प्राध्यापक वृंद व रजिस्ट्रार सी. के. पाटील आदी उपस्थित होते. उपग्रंथपाल रवींद्रसिंग नागरकोटी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ. सुनिता पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.