राजकारण

महाराष्ट्राने नाक दाबले तर तडफड होईल; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना इशारा

बेळगाव : तुम्हाला पश्चिम बंगालमधील अन्याय दिसतो, मग बेळगावातील दिसत नाही का? असा सवाल करतानाच महाराष्ट्राने नाक दाबायचं ठरवलं तर तडफड होईल, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या संजय राऊत यांनी एकिकरण समितीचा उमेदवारच विजयी होईल असे स्पष्ट केले. तत्पूर्वी राऊत यांनी बेळगावमध्ये रोड शो केला. या वेळी संयुक्त महाराष्ट्र चौकीतील सभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बांधलेले व्यासपीठ तोडले परंतु सभा होणारच असे संजय राऊत यांनी म्हटले होते. यानंतर संजय राऊत यांच्या सभेला परवानगी देण्यात आली. या सभेत राऊत यांनी मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला.

संजय राऊत यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालध्ये होणारा अन्या दिसत आहे. परंतु कर्नाटकमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेला अन्याय दिसत नाही आहे का? काश्मीरी पंडित नेहरुंनी केलेली चूक मोदींनी दुरुस्त केली मग कर्नाटकमध्ये झालेली चूकही दुरुस्त करा असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे. तानाशाही चालणार नाही. दादागिरीचा अधिकार आमच्याकडं आहे. आमचा जन्मच त्यासाठी झाला आहे. तानाशाही काय करताय, आम्ही हिटलरचे बाप आहोत. बाळासाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्राने मनात आणलं आणि नाक दाबायचं ठरवलं तर तडफड होईल असा इशारा राऊत यांनी दिला.

राऊत पुढे म्हणाले की, एकीकरण समितीचा उमेदवार शुभम लहान आहे. परंतु वजनदार आहे. सीमाभागाचे वजन घेऊन तुला लोकसभेत यायचं आहे. शिवसेनेचे आता २१ खासदार आहेत आणि तू २२ वा असशील. ही लढाई फक्त शुभमची नाही तर देशात जिथं जिथं मराठी माणूस आहे त्याच्या अस्मितेची आहे. छत्रपती शिवाजी महाराज असते तर पाकिस्तानाच्या सीमा कर्नाटकपर्यंत आल्या असत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीने रात्री काढणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे अशा शेलक्या शब्दात संजय राऊत यांनी कर्नाटक सरकारवर टीका केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button