अर्थ-उद्योग

हृतिक रोशन बनला ‘झेड ब्लॅक’ मंथन धूपचा ब्रँड अम्बॅसेडर

मुंबई: म्हैसूर दीप परफ्युमरी हाऊसने (एमडीपीएच) त्यांचा प्रमुख अगरबत्ती ब्रँड ‘झेड ब्लॅक’च्या मंथन धूपसाठी हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार हृतिक रोशनची ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. मंथन धूपच्या ‘मंथन जरुरी है’चे कॅम्पेन हृतिक करणार आहे. संपूर्ण देशामध्ये हृतिकची असणारी लोकप्रियता आणि प्रभाव लक्षात घेत एमडीपीएचला विश्वास आहे की, या माध्यमातून त्यांचा प्रिमियम मंथन धूप ब्रँड प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचेल आणि प्रत्येक भारतीयाच्या घरात धार्मिक आणि उत्सवपूर्ण वातावरण निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार एम.एस.धोनी झेड ब्लॅकच्या ३ इन १ अगरबत्तीचे ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नेतृत्व कायम ठेवणार आहे.

भारतीय संस्कृतीत पवित्र, शुद्ध, सात्विक वातावरण निर्मितीची किमया अगरबत्ती आणि धुपमध्ये दिसून येते. हीच किमया कायम ठेवण्यासाठी एमडीपीएच विविध सुगंधीत अगरबत्ती, धूप निर्मिती क्षेत्रात यशस्वीरीत्या कार्यरत आहे. मंथन धुपच्या ‘मंथन जरुरी है’ या नव्याकोऱ्या जाहिरातीत हृतिक डान्सच्या माध्यमातून मंथनचा संदेश अधोरेखित करणार आहे. याची कोरिओग्राफी फराह खान यांनी केली आहे. टीव्ही, डिजिटल प्लॅटफॉर्म, आगामी सण-उत्सव तसेच आयपीएलच्या नवीन सिझन दरम्यान ही जाहिरात प्रामुख्याने दिसणार आहे. ”स्वतःचे मंथन करणे ही काळाची गरज आहे. मंथनमुळे मन, शरीर आणि आत्माचे होणारे एकत्रीकरण, त्यामुळे निर्माण होणारी सकारात्मक उर्जा ही खूपच प्रेरणादायी असते. ‘मंथन जरुरी है’ या कॅम्पेनच्या माध्यमातून हा महत्वपूर्ण संदेश संपूर्ण भारतात पोहोचणार असल्याचा मला खूप आनंद आहे. विशेष म्हणजे भारतातील कुटुंबियांना मोठ्या स्तरावर सेवा प्रदान करणे, हे एमडीपीएच आणि माझे सारखेच ध्येय असल्याने मंथन धूप ब्रँडचा एक महत्वपूर्ण भाग होताना मला समाधान वाटते” असा आनंद हृतिक रोशनने व्यक्त केला. हृतिक रोशन झेड ब्लॅक मंथन धूप आणि धूप बत्तीचा प्रचार करणार आहे, जी इसेन्शिअल ऑईल्स आणि नैसर्गिक सामग्रीचा वापर करून बनवली असून मोगरा, केवडा, चमेली, अननस, चंपा, चंदन, गुलाब आदी सुगंधांमध्ये उपलब्ध आहे.

हृतिकसोबत केलेल्या असोसिएशनमुळे मंथन धूपबत्ती आणि धुपस्टिकचा राष्ट्रीय स्तरावर निश्चित प्रसार होईल. एखाद्या धूप ब्रॅण्डने ब्रँड अम्बॅसेडर ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. आमच्या धूपबत्ती, धुपस्टिकचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची निर्मिती करताना बांबूचा वापर केला जात नाही. मंथनच्या सुगंधित धूपचे देशभरात विशेषतः उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात मार्केट आहे. झेड ब्लॅक, आमचे राष्ट्रीय ब्रँड अ‍ॅम्बेसेडर एम.एस.धोनी आणि मंथनचा चेहरा म्हणून हृतिक यांच्यातील समन्वयामुळे देशातील पहिल्या तीन धूप स्टिक उत्पादकांपैकी एक म्हणून आमचे स्थान मजबूत होण्यास मदत होईल.’ असा विश्वास एमडीपीएचचे संचालक आणि भागीदार अंशुल अग्रवाल यांनी व्यक्त केला.

२५ वर्षांहून अधिक काळ सर्वोत्तम सुंगधी उत्पादने बनवण्यात आम्ही कार्यरत आहोत. आपल्या कठोर मेहनतीमुळे आणि प्रार्थनेवरील विश्वासामुळे हृतिकने युवा वर्गासमोर आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. त्याचा उत्साह आणि ध्येय हे आमच्यामध्येही असल्याने आमचे विचार फार जुळतात. त्यामुळे युवा वर्गाला नजरेसमोर ठेवत बनवण्यात आलेले ‘मंथन जरुरी है’ हे कॅम्पेन मार्केटमध्ये मोठ्या स्तरावर यशस्वी ठरेल. पूर्वापार चालत आलेल्या पारंपरिकपद्धती, पारदर्शकता, नाविन्यपूर्ण सुगंध हे आमच्या उत्पादनांचे मुख्य आधारस्तंभ आहेत. यामुळेच आमच्या अगरबत्ती उत्पादनांचा बाजारात यश्वसिरित्या प्रवास सुरु आहे, असे एमडीपीएचचे संचालक आणि भागीदार अंकित अग्रवाल म्हणाले.

झेड ब्लॅककडे धूप स्टिक उद्योगाच्या १५ टक्क्यांपेक्षा जास्त बाजारपेठेचा वाटा आहे आणि त्याचे वितरण मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचे मध्य प्रदेशमधील
इंदोर येथे जगातील सर्वात मोठे कच्या अगरबत्ती उत्पादनाचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. येथे ३ हजारहून अधिक कर्मचारी असून ८० टक्के महिला आहेत. ३०हुन अधिक देशांमध्ये त्यांची उत्पादने निर्यात केली जात असून यामध्येयूएसए, ब्राझील, इथोपिया, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, मलेशिया आदी ठिकाणांचा समावेश आहे. मंथन जरुरी है’ कॅम्पेनची संकल्पना ओबेरॉय आयबीसी यांची आहे.

गेल्या १० वर्षांमध्ये झेड ब्लॅक ब्रँडची होणारी यशस्वी वाटचाल पाहून मला आनंद होत आहे. आज हा भारतातील सर्वोत्कृष्ट धूप ब्रँड आहे. आता हृतिक रोशन या ब्रँडसोबत जोडला गेल्याने ही वाटचाल अधिकच उंचावर जाईल. भारतीय संस्कृती आणि जीवनशैलीबद्दल जाण असणाऱ्या अशा प्रतिभावान कलाकारासोबत काम करणे खूपच स्फूर्तीदायक आहे, असे ओबेरॉय आयबीसीचे व्यवस्थापकीय संचालक आनंद ओबेरॉय म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button