भारताचा पहिला फोल्डेबल एअर कूलर ‘हिंदवेअर स्नोक्रेस्ट आय-फोल्ड’साठी नवीन टीव्हीसी सादर
नवी दिल्ली : हिंदवेअर अप्लायन्सेसने भारताचा पहिला फोल्डेबल एअर कूलर ‘हिंदवेअर स्नोक्रेस्ट आय-फोल्डच्या लाँचला साह्य करण्यासाठी नवीन टीव्हीसी मोहिम ‘समर्स में करे कोल्ड, विंटर्स में हो जाये फोल्ड’ सादर केली. कंपनीचा नाविन्यपूर्ण एअर कूलर आय-फोल्डच्या माध्यमातून एअर कूलर विभागामधील त्यांचे ऑफरिंग विस्तारित करण्याचा मनसुबा आहे. हा एअर कूलर प्रतितास ३४०० घनमीटरच्या शक्तिशाली हवाप्रवाहासह कार्यक्षम कूलिंग देतो आणि वापरात नसताना सुलभपणे स्टोअर करता येण्यासाठी फोल्ड करता येऊ शकतो.
डीडीबी मुद्रा ग्रुपची संकल्पना असलेली ही जाहिरात पलंगावर तळमळत असलेल्या एका वृद्ध व्यक्तीला दाखवण्यासह सुरु होते. तो भेटायला आलेल्या त्याच्या मुलाला शहरातील उष्ण वातावरणाबाबत तक्रार करतो. किचनमध्ये चहा बनवण्यामध्ये व्यस्त असलेला मुलगा त्याच्या वडिलांचे बोलणे ऐकतो आणि फक्त म्हणतो की ‘खोल दो’. गोंधळून गेलेला वृद्ध व्यक्ती त्याचे शर्ट काढतो आणि हळूहळू सर्व कपडे काढू लागतो, कारण त्याला वाटते की त्याच्या मुलाने तसे करायला सांगितले आहे. मुलगा लिव्हिंग रूममध्ये येतो आणि वडिलांना शरीरावर फक्त बनियान व बॉक्सर्स असलेल्या स्थितीमध्ये पाहतो तेव्हा तो त्याच्या वडिलांच्या जवळच असलेल्या फोल्डेबल हिंदवेअर स्नोक्रेस्ट आय-फोल्ड एअर कूलरकडे बोट दाखवतो. शेवटी विलक्षण कॉमेडीचा शेवट होतो. त्यानंतर जाहिरात आय-फोल्डची नाविन्यपूर्ण ईजी-टू-स्टोअर क्षमता, तसेच शक्तिशाली कूलिंगला दाखवते. हे उत्पादन कशाप्रकारे सर्व ऋतूंसाठी उपयुक्त असल्याचे दाखवत जाहिरातीचा शेवट होतो.
ही सर्वांगीण एकीकृत मोहिम टीव्ही, प्रिंट आणि डिजिटल अशा व्यासपीठांवर पाहता येईल. व्यापक पोहोचसाठी मोहिम इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि डिजिटल मीडिया व्यासपीठांवर, तसेच जीईसी, सोनी सब अशा २४ टेलिव्हिजन चॅनेल्सवर आणि आज तक, एनडीटीव्ही व एबीपी नेटवर्क अशा प्रख्यात न्यूज चॅनेल्सवर प्रसारित होईल. तसेच ही जाहिरात उत्तम लक्ष्यसाठी फेसबुक, यूट्यूब व इन्स्टाग्राम अशा हिंदवेअर अप्लायन्सेस सोशल मीडिया चॅनेल्सवर देखील पाहता येणार आहे.
ही जाहिरात हिंदी, मराठी, बंगाली, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्याळम अशा इतर प्रादेशिक भाषांमध्ये देखील उपलब्ध असणार आहे. ही टीव्हीसी पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक व ईशान्यकेडील राज्यांमध्ये पाहता येणार आहे.
सोमानी होम इनोवेशन लिमिटेडचे (एसएचआयएल) मुख्य कार्यकारी अधिकारी व पूर्णवेळ संचालक श्री. राकेश कौल म्हणाले, ”एक कंपनी म्हणून आम्ही आमच्या ग्राहकांसाठी सादर करत असलेल्या प्रत्येक उत्पादनामध्ये नवोन्मेष्काराला प्राधान्य देतो. हिंदवेअर स्नोक्रेस्ट आय-फोल्ड यामध्ये अपवाद नाही. आय-फोल्डच्या माध्यमातून आमचा प्रत्येक भारतीय घराला फक्त उन्हाळ्यासाठीच नव्हे तर आगामी ऋतूंसाठी देखील सर्वांगीण सोल्यूशन देण्याचा मनसुबा आहे. आता आम्ही हा उन्हाळ्यासाठी सुसज्ज, ईजी-टू-स्टोअर, शक्तिशाली एअर-कूलिंग डिवाईस निर्माण केला असताना आमच्या ग्राहकांना या डिवाईसचा अधिकाधिक वापर करताना पाहण्यास उत्सुक आहोत.”
श्री. कौल पुढे म्हणाले, ”आय-फोल्ड हे अद्वितीय उत्पादन आहे, म्हणूनच त्यासाठी अनोखी मोहिम असणे आवश्यक होते. विविध लिहिण्यात आलेल्या नोट्स व अविश्वसनीय विचारशील सत्रांनंतर आम्ही अखेर उत्पादनाची खासियत सादर करणारा संवाद ‘समर्स में करे कोल्ड, विंटर में हो जाये फोल्ड’ सादर केला. टीव्हीसीला अंतिम रूप देताना आम्ही संपूर्ण प्रॉपर्टीमध्ये टॅगलाइनप्रमाणे तीच धमाल व साधेपणा असण्याची खात्री घेतली, ज्यामधून आय-फोल्डच्या उल्लेखनीय ऑफरिंग्ज समोर आल्या.”
या जाहिरातीबाबत बोलताना फिंगरप्रिंट फिल्म्सचे दिग्दर्शक करण शेट्टी म्हणाले, ”गेल्या वर्षी पटकथा आमच्याकडे आली तेव्हा माझी टीम व मला अनिश्चित सूचना, साधे-सोपे गैरसमज आणि हलके-फुलके ट्विस्ट-इन-टेल अचूकतेने उत्पादन सादर करण्याची संकल्पना आवडली. या जाहिरातीसाठी काम करण्याचा अनुभव संस्मरणीय ठरला. मला नाविन्यपूर्ण उत्पादनासह काम करण्याची संधी मिळाली. आम्ही या जाहिरातीसाठी राजेश पुरीची निवड केली, ज्यामधून ही विलक्षण व अद्भुत पटकथा निर्माण करण्यासाठी जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.”
डीडीबी मुद्रा ग्रुपचे नॅशनल क्रिएटिव्ह डायरेक्टर राहुल मॅथ्यू म्हणाले, ”साधीसोपी धमाल कामी ठरू शकणार नसल्यामुळे अद्वितीय धमाल सादर करण्याचा आमचा विचार होता. शब्द ‘खोल दो’संदर्भातील जाहिरात आणि भारतीय वंशाच्या वडिलांची उन्हाळा सुरू होताच कटकट करण्याची सवय या पटकथेमधील महत्त्वपूर्ण बाजू होत्या. या टीव्हीसीने आय-फोल्डच्या कार्यक्षमता उत्तमरित्या दाखवण्याची खात्री घेतली. कथेमधील विनोदी घटक प्रेक्षकांना जाहिरातीकडे आकर्षून घेतात.”