Top NewsUncategorizedमहिलामुक्तपीठ

जीन्स आणि टॉपमध्ये गुजरातमधील हायफाय भिकारी !

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमध्ये जीन्स आणि टॉप, पायात शूज अशा हायफाय पेहरावात अनेक महिला भीक मागताना दिसत आहेत. कोणाला विश्वासच बसत नव्हता, परंतू त्यांचे रडगाणे ऐकून लोक त्यांना चक्क १००-२०० रुपये भीक म्हणून देत होते. धक्कादायक बाब म्हणजे या महिलांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी गुजरातच्या अहमदाबादच्या असल्याचे सांगितले . पोलिसांनी या महिलांविरोधात शांततेत बाधा आणल्याचा गुन्हा दाखल करून कोर्टात हजर केले. त्यांना प्रत्येकी २ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्यात आले आहे.

एवढ्या चांगल्या घरच्या दिसणा-या महिला भीक मागताना पाहून काहींना संशय आला म्हणून त्यांनी थेट पोलिसांनाच सांगत काही महिलांना ताब्यात घेण्यास लावले आहे. जास्त भीक मिळण्यासाठी हा नवा फंडा सुरु झाला आहे. काही तरुणींना पोलिसांनी अटक केली आहे. रस्त्यारस्त्यांवर या महिला कारचालक असेल किंवा दुचाकीचालक त्यांना आपले रडगाणे सांगून भीक मागत होत्या. आपण खूप त्रस्त आहोत, घरची हालत खराब आहे थोडी आर्थिक मदत हवी आहे असे सांगत त्या वाहनचालकांकडून पैसे उकळत होत्या.

रायबरेलीच्या आंवला-बदायू रोडवरील मेडिकल कॉलेजजवळ त्यांनी हे कृत्य करण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला लोकांना त्यांच्या पेहरावाकडे पाहून विश्वास बसू लागला होता. अनेकांनी त्यांच्या भुलथापांना बळी पडून १००-२०० रुपये दिले होते. रस्त्यावरचा भिकारी असेल तर त्याला सहसा दोन-पाच, दहा रुपये दिले जातात. परंतू, या महिला चांगल्या पोशाखात असल्याने त्या चांगल्या घरच्या वाटत होत्या. त्यांना खरोखरच गरज असेल म्हणून विचार करून लोक पैसे देत होते. हेच हेरून या महिला अहमदाबादहून रायबरेलीमध्ये भीक मागण्यासाठी आल्या होत्या.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button