अर्थ-उद्योग

एचडीएफसी एर्गोकडून शेतकऱ्यांसाठी वेबवर आधारित स्व-सहाय्यता पोर्टल

मुंबई: एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स या भारतातील खासगी क्षेत्रातील आघाडीच्या बिगर जीवनविमा कंपनीने आज शेतकऱ्यांना आपल्या स्थानिकीकृत आणि सुगीनंतरच्या दाव्यांना कंपनीवर सूचित करण्यासाठी मदत करण्याच्या दृष्टीने वेबवर आधारित स्व-सहाय्यता पोर्टल आणले आहे. एचडीएफसी एर्गो ही एक आघाडीची कंपनी आहे, जी भारत सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत (पीएमएफबीवाय) ६.९ दशलक्षपेक्षा जास्त शेतकऱ्यांना विमा कव्हरेज देते.

पीएमएफबीवायच्या कार्यान्वित मार्गदर्शक तत्त्वांमधून शेतकऱ्यांना टोळधाड, गारपीट आणि दरड कोसळणे अशा प्रकारच्या नुकसानांसाठी आपले दावे सादर करणे सक्तीचे ठरले आहे. अलीकडील काळापर्यंत हे दावे एकतर एचडीएफसी एर्गोच्या कॉल सेंटर्स, शाखा किंवा पीएमएफबीवाय पोर्टल / अर्जांमधून सूचित केले जात होते. परंतु, पीएमएफबीवायमध्ये नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची वाढती संख्या आणि विम्याबाबत वाढत्या जागरूकतेमुळे अनेकांना आपले दावे नोंदवणे शक्य झाले नाही आणि त्यामुळे ते असमाधानी राहिले.

या आव्हानामुळे एचडीएफसी एर्गोने एक तंत्रज्ञानावर आधारित एक उपाययोजना आणण्यास प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे दाव्यांची सूचना सुलभ आणि सोयीच्या पद्धतीने वेबवर आधारित स्व-सहाय्यता पोर्टलच्या माध्यमातून देणे शक्य झाले. या पोर्टलद्वारे सूचना दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त पीएमएफबीवाय अर्ज क्रमांक किंवा बँक खाते तपशील दाखल करणे आणि त्यानंतर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ६ विशिष्ट तपशील भरणे गरजेचे आहे. त्यासाठी एक मिनिटापेक्षाही कमी कालावधी लागतो. हे स्व-सहाय्यता पोर्टल शेतकऱ्यांना इतरही अनेक फायदे देते. जसे,

पीएमएफबीवाय अर्जासोबत तात्काळ क्लेम क्रमांकाच्या मॅपिंगद्वारे वेळेत पूर्तता
शेतकऱ्यांसाठी एक मिनिट दावा नोंदणीद्वारे ग्राहकांची सोय
तात्काळ दावा क्रमांक निर्मिती आणि शेतकऱ्यांना एसएमएस निश्चितीमुळे आनंद
हे स्व-सहाय्यता पोर्टल आणण्याबाबत बोलताना एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीचे उप-व्यवस्थापकीय संचालक श्री. अनुज त्यागी म्हणाले की, सर्व दाव्यांवर प्रक्रिया करणे आणि ग्राहकांच्या समस्यांना उपाय देणे हे आमचे सर्वाधिक प्राधान्य आहे आणि एक डिजिटल प्रथम विमा कंपनी म्हणून आम्ही आमच्या सर्व उपाययोजना तंत्रज्ञानाने युक्त असतील याची काळजी घेतो. आम्ही करत असलेल्या सर्व कार्यांमध्ये तंत्रज्ञानाचा समावेश केल्यामुळे ग्राहकांना दावा समायोजनासाठी वेगवान कालावधी मिळतो. हे नवीन वापरकर्ता स्नेही पोर्टल आणल्यामुळे आम्ही दाव्याची सूचना आणि शेतकऱ्यांसाठी ट्रॅकिंग प्रक्रिया सुलभ व सुयोग्य केली आहे.”

डिजिटल प्रथम असलेली एचडीएफसी एर्गो ही कंपनी देशभरातील ग्राहकांना डिजिटल बाबतीत सक्षम करणे आणि सर्व सेवा सहजपणे उपलब्ध आणि समजण्यासारख्या करणे यासाठी लक्ष केंद्रित करते. सध्या सूचित करण्यात आलेल्या दाव्यांपैकी ३३ टक्के दावे स्व-सहाय्यता पोर्टलमधून आलेले आहेत. शेतकरी येथे लॉगिन करून स्व-सहाय्यता पोर्टल पाहू शकतात: https://customersupport.hdfcergo.com/selfhelp/RABG_Claim.aspx

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button