जीटी फोर्सद्वारे ईव्ही प्रकारात ३ दुचाकींचे अनावरण
उच्च गतीची स्कूटर, कमी गतीची स्कूटर आणि प्रोटोटाईप मोटरसायकलीचा शुभारंभ
मुंबई : पर्यावरण अनुकूल पद्धतीने पुढे जाणारी इलेक्ट्रिक वाहन कंपनी असलेल्या जीटी- फोर्सने जीटी ड्राईव्ह, जीटी ड्राईव्ह प्रो आणि इलेक्ट्रिक मोटरसायकल प्रोटोटाईप ह्या तीन इलेक्ट्रिक दुचाकींचे प्रस्तुतीकरण केले. ह्या स्टार्ट अप ईव्ही उत्पादक कंपनीने आकर्षक शैली व उत्तम तंत्रज्ञानाचे उदाहरण दर्शवणा-या उच्च दर्जाच्या ईव्ही उत्पादनांच्या आकर्षक श्रेणीचे प्रस्तुतीकरण केले.
जीटी ड्राईव्ह – आधी जीटी ड्राईव्ह आणलेल्या जीटी फोर्सने उच्च गतीचा प्रकार ब्रँडने त्या श्रेणीमध्ये नव्याने आणला आहे. त्यामध्ये ६० किमी प्रति तास ही सर्वोच्च गती मिळते व एका चार्जवर १५० किमी इतके मोठे अंतर पार करता येते. हे उत्पादन हे लिथियम- आयर्न बॅटरीमध्ये उपलब्ध आहे. त्यासह तीन ड्राईव्ह मोडस मिळतात- इकोनॉमी, स्टँडर्ड आणि टर्बो. स्कूटरमध्ये क्रूझ नियंत्रण प्रणालीसुद्धा उपलब्ध केलेली आहे.
जीटी ड्राईव्ह प्रो- कमी गतीच्या प्रकारातील ही ई- स्कूटर छोट्या अंतरावर प्रवासासाठी सेवा देण्यासाठी बनवण्यात आली आहे. कुटुंब, महिला व मुलांच्या गरजा लक्षात घेऊन ह्या उत्पादनामध्ये सर्वांसाठी सुविधा देण्यात आली आहे. एका चार्जवर ती सहजपणे ७५ किमी इतके अंतर पार करू शकते आणि २५ किमी प्रति तास ही तिची सर्वोच्च गती आहे. हे उत्पादन लीड एसिड आणि लिथिअम आयन बॅटरी वर्शन्स ह्या दोन्ही पर्यायांसह उपलब्ध आहे.
जीटी- फोर्सचे सह- संस्थापक आणि सीईओ मुकेश तनेजा ह्यांनी म्हंटले, लोकांचा असा गैरसमज असतो की, ईव्हीज दूर अंतराच्या गरजांची पूर्तता करू शकत नाहीत किंवा त्या पुरेशा सुविधा देऊ शकत नहीत. ह्याचे कारण इतकेच आहे की, त्यांनी आजवर ह्या उत्पादनांचा अनुभव घेतलेला नाही आहे. त्यामुळे ही उत्पादने देशाच्या कानाकोप-यात सगळीकडे उपलब्ध करण्यासाठी आम्ही कठोर मेहनत करत आहोत. व्यापक ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी आमची टीम नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे.
ह्या उद्घाटनाविषयी बोलताना, जीटी- फोर्सचे सह संस्थापक आणि सीओओ राजेश सैत्य ह्यांनी म्हंटले, भारत हा ईसीईकडून हळु हळु ईव्ही कडे वाटचाल करत आहे. ग्राहकांसाठी गुणवत्तापूर्ण व अफॉर्डेबल अशी उत्पादने उपलब्ध करून आम्ही आमची भुमिका पार पाडत आहोत. आमचे उद्दिष्ट व्यापक राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेची पूर्तता करणे हे आहे व ते करण्यासाठी सर्व ग्राहकांना ईव्ही तंत्रज्ञानाची ओळख करून देणे अनिवार्य आहे. आम्ही आमच्या उत्पादन श्रेणीमध्ये टप्प्या टप्प्याने विस्तार करत आहोत व एक एक प्रकारच्या ग्राहकांच्या प्रवासातील आव्हानांना हाताळत आहोत. आमची कमी गतीची वाहने सहजपणे मुले, महिला व कुटुंबांच्या छोट्या अंतराच्या दररोजच्या प्रवासाच्या गरजांची पूर्तता करू शकतात. एकदा ईव्हीज उपलब्ध झाले की, लोक त्यांची निवड करणे सुरू करतील. परंतु तंत्रज्ञानाची ओळख झाल्यानंतर आणि ते कंफर्टेबल वाटल्यानंतरच ते ईसीईकडून ईव्ही हा बदल करण्याचा निर्णय योग्य माहितीसह घेऊ शकतील.
एक्स्पोमधील ऑडियन्ससाठी ब्रँडने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक मोटरसायकल प्रोटोटाईपचेही अनावरण केले आहे. २०२२ वर्षाच्या दुस-या उत्तरार्धात ही मोटर बाईक बाजारपेठेमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.
जीटी- फोर्सने आधीच आपल्या वितरकांचे नेटवर्क देशामध्ये ८० शहरांमध्ये व १०० पेक्षा जास्त वितरकांसह वाढवले आहे. सध्या तिची महाराष्ट्र, कर्नाटका, हरयाना, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानामध्ये विशेष उपस्थिती आहे. सध्याच्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस किमान १५० पेक्षा जास्त वितरकांचे तिचे उद्दिष्ट आहे. ब्रँडची शेवटच्या उत्पादनासाठी सध्या बाजारात ७ उत्पादने उपलब्ध आहेत.