फोकस

भुसावळ-इगतपुरी ‘मेमू’ला हिरवा कंदील; अन्य १८ गाड्याही पूर्ववत

नाशिकः नाशिकरांच्या बहुप्रतीक्षित नाशिक-भुसावळ-इगतपुरी मेमू एक्स्प्रेसचा श्रीगणेशा आजपासून होत आहे. तर दुसरीकडे नाशिक-मनमाड मार्गावरच्या रद्द झालेल्या १८ रेल्वे गाड्या आजपासून पूर्ववत होत आहेत. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची सोय होणार आहे.

नाशिक-भुसावळ-इगतपुरी मेमू ही रेल्वे गाडी आठ डब्यांची असणार आहे. ही गाडी भुसावळ जंक्शनवरून सकाळी ७ वाजता मार्गस्थ होईल. त्यानंतर ७.२६ ला जळगाव, १०.०९ वाजता चाळीसगाव, १२.०८ वाजता मनमाड, ०१.२३ वाजता नाशिक आणि त्यानंतर साधारणतः दुपारी ३ च्या सुमारास ही गाडी इगतपुरी येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात सकाळी सव्वानऊ वाजता ही गाडी इगतपुरी येथून निघणार आहे. तर भुसावळवला ही गाडी सायंकाळी ०५.१० वाजता पोहोचेल, अशी माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली.

रद्द गाड्याही पू्र्ववत

मुंबईत कळवा-दिवा दरम्यान रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे नाशिक मार्गावरच्या १८ रेल्वे काल ९ जानेवारीपर्यंत रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नागरिक आणि चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. एकीकडे एसटी बंद आहेत. दुसरीकडे महत्त्वाच्या रेल्वे बंद झाल्याने प्रवास करायचा तरी करा, असा सवाल प्रवासी करत होते. आत्या त्या रद्द झालेल्या गाड्या पूर्ववत धावत आहेत. त्यामुळे तपोवन, पंचवटी, नंदीग्राम, जनशताब्दी या गाड्यांसह मनमाड-नाशिक मार्गावरच्या रद्द झालेल्या फेऱ्या पूर्ववत होत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button