‘गोदरेज लॉक्स’ला ‘किचन सिस्टीम’ व्यवसायातून 100 कोटींचा महसूल अपेक्षित
‘स्मार्ट किचन स्टोरेज सोल्यूशन ब्रँड’ ‘स्किडो’ बाजारात सादर
मुंबई : गोदरेज समुहातील प्रमुख कंपनी, ‘गोदरेज अँड बॉइस’ हिचा व्यवसाय असलेल्या ‘गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टीम्स’ या व्यावसायिक युनिटला ‘गोदरेज किचन फिटिंग्ज आणि सिस्टीम्स’च्या व्यवसायात पुढील 5 वर्षांमध्ये 100 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. कंपनीने ‘स्मार्ट किचन स्टोरेज सोल्यूशन्स’ची एक अभिनव श्रेणी, “स्किडो” (स्मार्ट किचन ड्रॉवर्स अँड ऑर्गनायझर्स) सादर केली आहे. भारतीय स्वयंपाकघरांमधील अनोख्या स्वरुपाच्या गरजा भागविण्याच्या दृष्टीने कंपनीने स्किडोची खास रचना केली आहे. खास ‘भारतात डिझाइन केलेले आणि भारतासाठी बनविलेले’ हे उत्पादन आहे. स्वयंपाकघरातील कटलरी, कप व बशी, कढई, फ्राय पॅन, ताटे, पातेली आणि जार व बाटल्या यांसाठी किचन ड्रॉवर्स आणि समर्पित ऑर्गनायझर्स अशा आठ उत्पादनांचा या ‘स्किडो’ श्रेणीमध्ये समावेश आहे.
भारतीय स्वयंपाकघर आणि स्वयंपाकाच्या विविध शैलींचा अभ्यास करण्यासाठी कंपनीने व्यापक संशोधन केले. त्यातून ‘स्किडो’ ही श्रेणी विकसीत करण्यात आली. या संशोधनातून निघालेल्या निष्कर्षांनुसार, स्वयंपाकघर वापरणाऱ्या व्यक्तींचे वावरणे सोपे व सुटसुटीत व्हावे, अशा पद्धतीने ‘गोदरेज लॉक्स’ने नाविन्यपूर्ण स्टोरेज सोल्यूशन्सची स्किडो ही श्रेणी तयार केली. सध्या बाजारपेठेत उपलब्ध असणाऱ्या किचन स्टोरेज उत्पादनांवर पाश्चिमात्य स्वरुपाच्या किचनचा प्रभाव आहे आणि ग्राहकांनादेखील त्याशिवाय इतर पर्याय उपलब्ध नाहीत, हे लक्षात घेऊन खास भारतीय स्वयंपाकघराला व तेथील जागेला अनुकूल ठरतील, असे उपाय योजण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. त्या दृष्टीने ‘स्किडो स्टोरेज सोल्यूशन’ हे स्वयंपाकघरात बसवणे सोयीस्कर आहे, त्याची हलवाहलव करणे सोपे आहे आणि ते अनेक प्रकारे वापरू शकण्याजोगे आहे.
‘स्किडो’च्या सादरीकरणासंदर्भात ‘गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टीम्स’चे कार्यकारी उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख शाम मोटवानी म्हणाले, “भारतीय मॉड्यूलर किचन व्यवसायाचे बाजारमूल्य 2500 कोटी रुपये इतके आहे. 2019-2024 या 5 वर्षांत या मूल्यामध्ये दरवर्षी सुमारे 27 टक्क्यांची वाढ होत जाणार आहे. या विभागामध्ये प्रचंड क्षमता आहे, असे आमचे निरीक्षण असून गेल्या वर्षी आमच्या विक्रीमध्ये या विभागाचा वाटा 4 टक्के इतका होता. पुढील काही वर्षांत, या विभागातून 100 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचे आमचे लक्ष्य आहे. आधुनिक भारतीय कुटुंबे आता स्वयंपाकघराचा वापर एरवीपेक्षा जास्त करू लागली आहेत व स्वयंपाकघरांमध्ये प्रभावी सोल्युशन्स असावीत, अशी आकांक्षा बाळगू लागली आहेत. त्यामुळे ‘किचन अॅक्सेसरीज’ना आता नव्याने मागणी येऊ लागली असल्याचे आम्हाला दिसून येत आहे. ही मागणी व्यवसायवाढीला निश्चितच पूरक ठरणार आहे.”
‘किचन सिस्टीम्स’ या विभागात ‘गोदरेज लॉक्स’ ही कंपनी 2015 पासूनच कार्यरत आहे. या विभागात कंपनीने आतापर्यंत एर्गो ड्रॉवर्स, वायर बास्केट्स, कॉर्नर सोल्युशन्स, टॉल युनिट्स, सॉफ्ट प्रो सिस्टीम्स, ड्रॉवर चॅनेल्स आणि हिंजेस अशी विविध उत्पादने आणली. या विभागात आता ‘स्किडो’ हे नवीन उत्पादन दाखल झाले आहे. ‘स्किडो’ची किंमत प्रति सेट 15000 ते 20000 रुपयांपासून सुरू होते आणि सामान्य दुकानांत व हार्डवेअर दुकानांमध्ये हे उत्पादन उपलब्ध असेल.
‘गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टीम्स’विषयी :
गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टीम्स ही नाविन्यपूर्ण लॉकिंग उपकरणे बनविणारी, 123 वर्षे जुनी कंपनी आहे. 1897 मध्ये अर्देशीर गोदरेज यांनी स्थापना केल्यापासून गोदरेज हे नाव विश्वासार्हतेशी, सुरक्षेशी व प्रामाणिकपणाशी जोडले गेले आहे. 1897मध्ये पहिले अॅंकर ब्रॅंडेड कुलूप बनविण्यापासून सुरुवात झाली व त्यानंतर 1907मध्ये पहिले स्प्रिंगविरहीत कुलूप, 1954 मध्ये ‘नव-ताल’ हे आयकॉनिक कुलूप आणि आता ‘बायोमेट्रिक लॉक’, या सर्व प्रवासात ‘गोदरेज’ने कुलुपांच्या उद्योगात प्रत्येकवेळी विशेष मानके स्थापित केली आहेत.
गेली वर्षानुवर्षे, ‘गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टीम्स’ने कुलुपांचे स्वरूप, कार्य व अॅ‘प्लिकेशनची व्याप्ती बदलली आहे. अर्थात, अद्याप एक गोष्ट समान आहे – भरवसा आणि विश्वासार्हतेचा मजबूत ठसा. गोदरेज लॉक्स कंपनी जागतिक दर्जाच्या मापदंडांचे पालन करते आणि ‘आयएसओ 9001’, ‘आयएसओ 14001’ आणि ‘ओएचएसएएस 18001’ प्रमाणपत्रेही बाळगते.
अनेक वर्षांपासून जगभरातील अनेक देशांमध्ये, या ब्रँडने जागतिक दर्जाची स्मार्ट लॉकिंग सोल्यूशन्स वितरित केलेली आहेत. म्हणूनच ‘लॉकिंग डिव्हाइसेस’ ही केवळ प्रवेश व बहिर्गमन या बिंदूवर कार्यान्वित असण्याच्या पलिकडे, त्यांच्यामध्ये किती सुधारणा झाल्या आहेत याचा विचार करीत दरवाजापाशी क्षणभर थबकण्यापर्यंत, या ‘डिव्हाइसेस’बाबतच्या दृष्टीकोनात क्रांती घडवून आणण्याचे कामही या ब्रॅंडने केले आहे. अधिक माहितीसाठी, कृपया www.godrejlocks.com वर लॉग ऑन करा.