राजकारणस्पोर्ट्स

सौरव गांगुली राजकारणातील प्रवेशाबाबत म्हणतो, आता मी आपल्या कामाला सुरुवात करणार आहे

कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal assembly elections) पार्श्वभूमीवर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) राजकारणातील प्रवेशासंदर्भात जबरदस्त चर्चा सुरू आहे. राजकारणातील प्रवेशासंदर्भात विचारले असता, आयुष्याने मला अनेक संधी दिल्या. बघूया पुढे काय होते. आता मी स्वस्थ आहे आणि आपल्या कामाला सुरुवात करत आहे. याच वेळी त्याने क्रिकेटशी संबंधित अनेक गोष्टींवर थेट उत्तरे दिली.

कोलकात्याच्या ब्रिगेड ग्राउंडवर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका निवडणूक सभेला संबोधित केले होते. या सभेला भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तथा बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीही उपस्थित राहण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, तो या सभेत सहभागी झाला नाही. सौरव गांगुलीला 2 जानेवारीला हार्ट अ‍ॅटॅक आला होता. घरच्या जीममध्ये वर्कआऊट करताना त्याच्या छातीत दुखू लागले होते. यानंतर कुटुंबीयांनी त्याला तत्काळ वुडलँड्स रुग्णालयात दाखल केले होते. येथे त्याच्यावर ऐंजिओप्लास्टी करण्यात आली होती आणि त्याच्या हृदयाच्या धमन्यांत स्टेंट टाकण्यात आली होती. यावेळी 7 जानेवारीला त्याला रुग्णालयातून सुट्टी मिळाली होती. यानंतर 27 जानेवारीला पुन्हा गांगुलीची प्रकृती बिघडली. यानंतर त्याला कोलकात्याती अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता तो पूर्णपणे ठणठणीत आहे आणि कामाला सुरुवात करत आहे.

काही दिवसांपूर्वच सौरव गांगूलीच्या भाजप प्रवेशासंदर्भात बंगाल भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी भाष्य केले होते. यासंदर्भात बोलताना घोष म्हणाले होते, ”सौरव गांगुलीसंदर्भा येत असलेल्या वृत्तांत कसल्याही प्रकारचा दम नाही. यासंदर्भात सौरव गांगुली आणि भाजपकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेले नही.” गांगूली भाजपत आला तर चांगलेच आहे. पक्षात जे कुणी येईल त्याचे आम्ही स्वागतच करू. मात्र, सौरव गांगुलीशी यासंदर्भात कसल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button