‘सामना’तील मोदींच्या जाहिरातीवरुन आ. नितेश राणेंची टीका
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण आणि पुणे मेट्रोसह विविध विकास कामांचे उद्घाटन केले. दरम्यन, पंतप्रधानांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्यांसह शिवसेनेचे नेतेही उपस्थित होते. पण, शिवसेनेकडून कोणतीही भूमिका उघडपणे घेण्यात आली नाही. यातच शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तील मोदींच्या जाहिरातीवरुन भाजप नेते नितेश राणे यांनी सेनेवर निशाणा साधलाय.
Ganda hai par dhandha hai ye !!!
😅😅😅 pic.twitter.com/NDovnmnnxg— Nitesh Rane (@NiteshNRane) March 6, 2022
एरवी ‘सामना’तून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जहरी टीका केली जाते. पण, आता सामनाच्या पहिल्याच पानावर पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याची जाहिरात झळकली. यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी टीकास्त्र सोडले आहे. नितेश राणे यांनी ‘गंदा है पर धंदा है’ असे म्हणत सामनाचा फोटो ट्वीट केलं आहे.