आरोग्यराजकारण

उत्तर प्रदेशात भाजपच्या चौथ्या आमदाराचे कोरोनाने निधन

लखनऊ : देशभर उद्रेक घालणाऱ्या कोरोना व्हायरसने उत्तर प्रदेशात उच्छाद मांडल्याचे चित्र आहे. कारण उत्तर प्रदेशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. धक्कादायक म्हणजे आतापर्यंत तब्बल चार आमदारांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. माजी मंत्री आणि भाजपचे विद्यमान आमदार दाल बहादूर कोरी यांचं कोरोनानं निधन झालं आहे.

दाल बहादूर कोरी यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांना एक आठवड्यापूर्वी लखनऊमधील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. कोरोनामुळे यूपीत मृत्यू झालेल्या आमदारांची संख्या चारवर पोहोचली आहे. कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट सुरु झाल्यानंतर आतापर्यंत भाजपच्या चार आमदारांचं निधन झालं आहे. यापूर्वी आमदार केशर सिंह गंगवार, औरेयाचे भाजप आमदार रमेश दिवाकर आणि लखनऊ पश्चिमचे आमदार सुरेश श्रीवास्तव यांचा समावेश आहे. यानंतर आज आमदार दाल बहादूर कोरी यांचीही प्राणज्योत मालवली.

देशात कोरोनाचा उद्रेक

देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा विस्फोट होताना पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात कोरोनाचे चार लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. तर ३ हजार ९१५ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सलग दुसऱ्या दिवशी २४ तासातील कोरोना रुग्णसंख्येने चार लाखांचा टप्पा ओलांडला. गेल्या २४ तासात भारतात ४ लाख १४ हजार १८८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. म्हणजेच आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात जवळपास दोन हजारांनी वाढ झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button