Top Newsफोकस

हेलिकॉप्टर दुर्घटनेत माजी लष्करप्रमुख, सीडीएस बिपीन रावत यांचा मृत्यू

नवी दिल्ली: भारतीय लष्कराची दीर्घकाळ सेवा करणारे माजी लष्करप्रमुख आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं. या हेलिकॉप्टरमधून बिपीन रावत हे पत्नीसह प्रवास करत होते. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत या बाबतची माहिती दिली. तसेच या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

तामिळनाडूच्या कुन्नूर येथील जंगलात ही दुर्घटना घडली. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जातं. हेलिकॉप्टर दुर्घटनेतील जखमींना जवळच्या वेलिंग्टन बेसमध्ये नेण्यात आलं होते. मात्र दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. संरक्षण खात्याने या दुर्घटनेची सर्व माहिती घेतली असून या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

हेलिकॉप्टरमधून प्रवास करणारे अधिकारी : सीडीएस बिपीन रावत, मधुलिका रावत, ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्ट. कर्नल हरजिंदर सिंग, गुरुसेवक सिंग, जितेंद्र कुमार, विवेक कुमार, बी. साई तेजा, हवालदार सतपाल.

आगीचा भडका उडाला अन् झाडांनी पेट घेतला

बिपीन रावत हे पत्नीसह वेलिंग्टन येथील एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जात होते. वेलिंग्टनमध्ये आर्म्ड फोर्सचं महाविद्यालय आहे. या ठिकाणी रावत यांचं लेक्चर होतं. तिथून ते कुन्नूरकडे निघाले होते. त्यांना तिथून दिल्लीला जायचं होतं. मात्र, घनदाट जंगलात ही दुर्घटना घडली. कुन्नूरच्या घनदाट जंगलात चारही बाजूने झाडच झाडं आहेत. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघात होताच जंगलात आग लागली. या दुर्घटनेची माहिती मिळतात हवाई दल आणि लष्कराची पथकं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. हे हेलिकॉप्टर एमआय-सीरिजचं असल्याचं सांगितलं जातं. MI-17, V-5 या सीरिजचं हे हेलिकॉप्टर होतं. बिपीन रावत यांच्यासोबत काही अधिकारी आणि कर्मचारीही होतं.

डिसेंबर २०१९ मध्ये बिपीन रावत सेनादलातून निवृत्त होणार होते. ते निवृत्त होण्यापूर्वी नरेंद्र मोदी सरकारनं चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाची निर्मिती करुन त्यांना त्यापदावर काम करण्यासाठी संधी दिली होती. १६ मार्च १९५८ मध्ये बिपीन रावत यांचा जन्म झाला. त्यांचे वडील एलएस रावत सैन्यात होते. लेफ्टनंट जनरल एलएस रावत म्हणून त्यांची ख्याती होती. बिपीन रावत यांचं बालपण सैनिकांच्या सहवासातच गेलं. शिमल्याच्या सेंट एवडर्ड स्कूलमधून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यांचा परफॉर्मन्स पाहून त्यांना SWORD OF HONOUR ने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेतलं. तिथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजातून पदवीचं शिक्षण घेतलं. सोबतच त्यांनी हायकमांडचा कोर्सही पूर्ण केला.

पंतप्रधान मोदींनी बोलवली तातडीची बैठक

तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर दिल्लीतल्या हलचाली वाढल्या आहेत. सीडीएस बिपीन रावत यांच्या घरी राजनाथ सिंह जाऊन आले आहेत. तर त्यांनी दिल्लीत सुरक्षा दलाची बैठकही घेतली आहेत. बिपीन रावत यांच्या घराबाहेरील सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. याबाबत केंद्र सरकार उद्या संसदेत अधिकृत माहिती देण्याची शक्यता आहे. हेलिकॉप्टर अपघातनंतर दिल्लीत बैठका वाढल्या आहेत. केंद्र सरकारकडून लवकर काही तातडीची पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे.

अपघानंतर केंद्र सरकारच्या हलचाली वाढल्या आहेत. या अपघातात १३ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर एक गंभीर जखमी असल्याचं कळतंय. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी तातडीची बैठक बोलवली आहे. केंद्र सरकार काही तातडीने पाऊले उचलण्याची शक्यता आहे. या बैठकीला देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह हेही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

वायुप्रमुख घटनास्थळाकडे रवाना

वायुप्रमुख तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. घटनास्थळी जाऊन ते दुर्घटनेची पाहणी करणार आहेत. तर राजनाथ सिंह हेही घटनास्थळी भेट देण्याची शक्यता आहे.

याआधीही रावतांचा हेलिकॉप्टर अपघात

सीडीएस बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघात झाला आहे. त्यातून ते किरकोळ जखमी होत सुरूखरूप वाचले आहेत. ही घटना आहे ३ फेब्रुवारी २०१५ ची ज्यावेळी याआधी बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघात झाला होता. त्यावेळी बिपीन रावत सीडीएस पदावरती नव्हते, रावत यांना सीडीएस पदावर २०१६ मध्ये नियुक्त करण्यात आलं आहे. तेव्हा लेफ्टनंट बिपीन रावत नागालँडमधील दिमापूरमध्ये तैनात होते. दिमापूरमध्ये हेलिकॉप्टरमध्ये बसून रावत निघाले, आणि काही वेळातच हेलिकॉप्टरचं नियंत्रण सुटले आणि हेलिकॉप्टर पुन्हा जमीनीवर कोसळलं. हे हेलिकॉप्टर काही अंतरावर गेल्यानंतरच त्याचं इंजिन फेल झाले आणि ते कोसळले. हेलिकॉप्टर जास्त उंचीवर गेले नसल्याने रावत आणि पायलट यांना किरकोळ जखमा झाल्या होत्या. त्यानंतर या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात आली होती.

मरणाच्या दाढेतून परतलेले रावत

हेलिकॉप्टरचे अपघात अत्यंत भयंकर होत असतात. त्यातून बऱ्याचवेळा वाचण्याची शक्यता फार कमी असते, मात्र २०१५ मध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातातून रावत मरणाला मात देऊन सुखरूप वाचले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button