फोकस

कुर्ला येथे बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये आग, २० दुचाकी खाक

मुंबई : मुंबईत कुर्ला परिसरात भीषण आग लागली आहे. कुर्ला नेहरुनगर येथील एका बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये बुधवारी पहाटे ३:३० च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या जवळपास २० दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. आग इतकी भयंकर होती की आगीच्या ज्वाळा इमारतीच्या आठव्या मजल्यापर्यंत पोहचल्या होत्या.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तब्बल ८-९ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यात अग्निशमनदलाच्या जवानांना यश आले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. जळत्या सिगारेटचे थोटुक फेकल्यामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तर इमारतीतील काही रहिवाश्यांनी बिल्डिंगखाली बांधण्यात आलेल्या मंडपामुळे आगीचा भडका उडाल्याचे म्हटले आहे.

आगीचे लोट बिल्डिंगच्या आठव्या मजल्यावर पोहचल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्नीशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात यश आले असून आगीत कोणतीही जिवीत होनी झालेली नाही मात्र मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाल्याचे समोर येत आहे. कुर्ला परिसरातील या बिल्डिंगत लागलेल्या आगीचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. व्हिडिओच्या माध्यमातून या आगीची भीषणता किती होती हे पहायला मिळत आहे. ही भीषण आग का लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नसून पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button