राजकारण

दिल्लीच्या राजकारणात जाण्याची शक्यता फडणवीसांनी फेटाळली

नागपूर : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना स्थान मिळू शकते अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. मात्र फडणवीस यांनीच अशा शक्यतांच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. भाजपमध्ये पंतप्रधान मोदी जो आदेश करतात, तो आदेश शिरोधार्ह असतो. माझ्या शुभचिंतकांना वाटते की मला दिल्लीत काही मिळालं तर त्यांना चांगलं होईल. पण त्यांनाही सांगतोय, माझी दिल्लीत जाण्याची शक्यता नाही. काही लोकांना वाटतं मी दिल्लीला गेलो की बला टळेल; पण बला टळणार नाही, असे सांगत फडणवीस यांनी महाराष्ट्राबाहेर जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, नाना पटोले यांना ऊर्जामंत्री व्हायचं आहे, त्यामुळे त्यांनी सरकारमधील मंत्र्याबाबत पत्र लिहिले आहे. त्यांनी त्यांच्याच सरकारमधील गैरव्यवहार चव्हाट्यावर आणला आहे. त्यांनी केलेल्या आरोपाची सखोल चौकशी करावी. विधानसभा अध्यक्षपदाबाबत भाजप आता भूमिका मांडणार नाही. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आधी घोषित होऊ द्या, त्यासंदर्भात निर्णय केल्यानंतर भाजप आपली भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button