अर्थ-उद्योगइतर

डीएचएफएल घोटाळा : माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या जावई आणि मुलीची प्रॉपर्टी ‘ईडी’कडून जप्त

नवी दिल्ली : दिवाळखोरीत निघालेल्या दिवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (DHFL) प्रमोटर्स कपिल आणि धीरज वाधवानसंबंधीत असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde Daughter) यांची मुलगी प्रीती राज श्रॉफ आणि जावई राज श्रॉफ यांची कमर्शियल संपत्ती ईडीने जप्त केली आहे. जप्त केलेली संपत्ती अंधेरी पूर्व येथील कालेडोनिया बिल्डिंग येथे आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकने (PMC Bank Scam) दिवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेडला (डीएचएफएल – DHFL) दिलेल्या 3,688.58 कोटी रुपयांचं कर्ज फ्रॉड घोषित केलं. या कंपनीची YES बँकमध्येही लोन घोटाळ्याबाबत चौकशी सुरू आहे. कंपनीचे प्रमोटर वाधवान बंधु अटकेत असून ईडीने त्यांची संपत्ती जप्त केली आहे. येस बँक लोन घोटाळ्याप्रकरणी ईडीने बँकेचे माजी प्रमुख राणा कपूर आणि DHFL चे प्रमोटर्स कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांची 2400 कोटी रुपयांची प्रॉपर्टी अटॅच आहे. यात राणा कपूर यांची 1000 कोटी आणि वाधवान बंधुंची 1400 कोटी रुपयांची प्रॉपर्टी सामिल आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने DHFL प्रकरण नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्यूनलकडे (NCLT)सोपवलं होतं. DHFL अशी पहिली वित्तीय कंपनी आहे, जी RBI ने कलम 227 अंतर्गत विशेष अधिकारांचा वापर करत NCLT मध्ये पाठवली होती. यापूर्वी कंपनी बोर्डाला बरखास्त करण्यात आलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button