Top Newsराजकारण

अनिल देशमुख यांच्या मुंबई, नागपुरातील निवासस्थानी ईडीचे छापे; तगडा बंदोबस्तही तैनात

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) छापा टाकला आहे. ईडीचे अधिकारी अनिल देशमुखांच्या दोन्ही निवासस्थानी सकाळीच दाखल झाले. त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे आणि कागदपत्र देखी तपासली जात आहे. इतकंच काय तर घराबाहेर केंद्रीय सुरक्षा दलाचा (सीआरपीएफ) सशस्त्र बंदोबस्त करण्यात आला आहे. पण अनिल देशमुख नेमके आहेत कुठे? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी ईडीचे अधिकारी सकाळी ८ च्या सुमारास दाखल झाले. यावेळी घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले. पण अनिल देशमुख घरात नसल्याची माहिती समोर आली. नागपूरच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांनीही अनिल देशमुख घरी नसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यानंतर मुंबईत वरळी येथील अनिल देशमुखांच्या निवासस्थानी देखील ईडीचे अधिकारी सकाळपासून चौकशी करत आहेत. पण मुंबईतही अनिल देशमुख नाहीत अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळेच अनिल देशमुख नेमके आहेत कुठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान, अनिल देशमुख काही दिवसांपूर्वी दिल्लीला गेले होते, अशी माहिती समोर आली आहे. पण त्यानंतर ते दिल्लीहून परतून पुण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनिल देशमुख सध्या पुण्यात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

मुंबईतील वरळी येथे सुखदा टॉवरमध्ये अनिल देशमुख यांचं निवास्थान आहे. याठिकाणी ईडीचे पाच ते सहा अधिकारी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे अनिल देशमुखांच्या नागपूरातील घराबाहेर सकाळपासूच केंद्रीय पोलीस दलाचे सुरक्षा रक्षक देखील तैनात आहेत. आज सकाळी ईडीचे पाच अधिकारी अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी दाखल झाले. गुरूवारी ईडीकडून पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांची देखील याप्रकरणात चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज ईडीनं अनिल देशमुखांच्या घरावर छापा टाकला आहे. याआधी मे महिन्यात देखील अनिल देशमुखांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. यात महत्वाची कागदपत्रं जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button